11 वर्षांनंतर विमान प्रवाशांमध्ये झाली एवढी घट...

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 जानेवारी 2020

मुंबई : मुंबई व नवी दिल्ली येथील विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत 2008 नंतर या वर्षी प्रथमच घट झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा देशातील या दोन प्रमुख विमानतळांवरील प्रवासी कमी झाले आहेत. देशातील आर्थिक मंदी हे त्यामागील मुख्य कारण असल्याचे मानले जात आहे. त्याचप्रमाणे एप्रिलमध्ये जेट एअरवेज बंद झाल्यामुळे या दोन विमानतळांवरील प्रवाशांच्या संख्येत घट झाली आहे.

धक्कादायक तीर रपकन घुसला तिच्या मानेत, लागलेला तीर एक दिवस मानेतच..

नवी दिल्लीतील इंदिरा गांधी विमानतळावरील देशांतर्गत प्रवाशांच्या संख्येत घट झाली; मात्र परदेशांत जाणाऱ्या व येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येत फारशी घट झाली नाही. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मात्र या दोन्ही प्रकारचे प्रवासी घटल्याचे आकडेवारीवरून दिसते. या दोन विमानतळांवरील प्रवाशांची संख्या 2018 मध्ये 1.4 कोटी होती, तर 2019 मध्ये ही संख्या 1.3 कोटींवर आली. तब्बल 11 वर्षांनंतर हवाई प्रवाशांच्या संख्येत सात टक्‍क्‍यांनी घट झाली आहे.

महत्वाचे लाकडी चमचे, वाट्या वापरताय ? आधी 'ही' बातमी वाचा..

आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघाच्या (आयटा) अहवालानुसार, 2018 च्या तुलनेत 2019 मध्ये मुंबईतील हवाई प्रवाशांच्या संख्येत सात टक्‍क्‍यांनी घट झाली आहे. एप्रिल 2019 मध्ये जेट एअरवेजची अखेर, धावपट्टीची दुरुस्ती, अतिवृष्टी या कारणांमुळे अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली. त्याचबरोबर भारत-पाकिस्तान यांच्यातील वाढत्या तणावामुळे या दोन देशांतील हवाई वाहतूक बंद करण्यात आली. परिणामी विमान कंपन्यांना उड्डाणे रद्द करावी लागली. 

ही बातमी वाचलीये का.. त्यांनी दिवसाढवळ्या केलं 'हे' काम; मग काय 'ते' संतापले

प्रवाशांची संख्या 
मुंबई विमानतळ 2018 2019 घट 
देशांतर्गत 4.98 कोटी 4.7 कोटी 5.6 टक्के 
आंतरराष्ट्रीय 1.4 कोटी 1.3 कोटी 7 टक्के 

Decrease the number of air passengers after 11 years

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decrease the number of air passengers after 11 years