Loksabha Election: निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'ला बसणार आळा? राज्य सरकार करणार कठोर कारवाई

एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात.
Loksabha Election: निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'ला बसणार आळा? राज्य सरकार करणार कठोर कारवाई
Loksabha Election deepfakesakal

Mumbai Loksabha: लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे / डिजिटल माध्यमांवरून प्रसारित करण्यात येत आहे. अशा गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी संबंधितांवर कडक कारवाई शासनामार्फत करण्यात येणार आहे.

फोटोशॉप, मशीन लर्निंग (एमएल) किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांसारख्या विविध तंत्रांचा गैरवापर करून डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करण्यात येतो. निवडणुकीदरम्यान या तंत्राचा गैरवापर हा सध्या चिंतेचा विषय आहे. एखादा उमेदवार, राजकीय पक्ष किंवा निवडणुकीच्या मुद्द्याविषयी चुकीचे व्हिडिओ, ऑडिओ, फोटो तयार करण्यात येतात किंवा खऱ्या फोटो, ऑडिओ, व्हिडिओमध्ये फेरफार करून ते चुकीच्या पद्धतीने प्रसारित करण्यात येतात.

Loksabha Election: निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'ला बसणार आळा? राज्य सरकार करणार कठोर कारवाई
Loksabha Election 2024 : ‘व्होट जिहाद’ हीच ‘इंडिया’ची रणनीती ; आणंदमधील सभेत पंतप्रधान मोदींचे टीकास्त्र

हे डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स किंवा फोटो खरे असल्यासारखे भासतात आणि त्यामुळे संबंधिताविषयी गैरसमज किंवा बदनामी होते. निवडणूक काळात अशा प्रकरणांमध्ये वाढ होत असून यावर आळा घालण्यासाठी तसेच स्वच्छ आणि पारदर्शक निवडणूक प्रक्रिया होण्याच्या दृष्टीने ‘डीप फेक’ कंटेंट तयार करणाऱ्या आणि प्रसारित करणाऱ्या समाजकंटकांवर कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचना शासनाने दिल्या आहेत.

राज्य शासनामार्फत पोलीस महासंचालकांना यासंदर्भात सूचना देण्यात आल्या असून पोलीस खात्यामार्फत यासंदर्भात कार्यवाही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगानेही विपर्यस्त माहिती रोखण्यासंदर्भात त्यांच्या मार्गदर्शिकेमध्ये सूचना दिल्या आहेत.

Loksabha Election: निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'ला बसणार आळा? राज्य सरकार करणार कठोर कारवाई
Loksabha Election : लग्नसोहळ्यांतही रंगतोय प्रचाराचा फड ; साहेब आले म्हणून नागरिक अन् मतदार भेटले म्हणून उमेदवार खुश

डिप फेक व्हिडीओ

या निवडणूकीदरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा आरक्षण समाप्त करण्याबद्दलचा व्हिडीओ प्रसारीत झाला. हा व्हिडीओ डिप फेक असून विरोधकांनी तो पसरवला असल्याचा आरोप अमित शहा यांनी आरोप केला.

यावरुन दिल्ली पोलिसांनी काही जणांना अटक केली असून तेंलगणाचे मुख्यमंत्र्यांना समन्स जारी केले आहे.काही अभिनेत्यांचे प्रचाराचे डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहेत.काँग्रेसचे अध्यक्ष खर्गे आणि राहुल गांधी यांचेही काही डिप फेक व्हिडीओ प्रसारीत झाले आहे.

Loksabha Election: निवडणुकीदरम्यान 'डीप फेक'ला बसणार आळा? राज्य सरकार करणार कठोर कारवाई
Loksabha Election 2024 : राहुल गांधी यांची पुण्यात सभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com