निकाळजेला अटक न करण्याचा आदेश

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 एप्रिल 2018

मुंबई - गॅंगस्टर छोटा राजनचा भाऊ दीपक निकाळजेला बलात्काराच्या एका प्रकरणात 11 जूनपर्यंत अटक न करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले. तक्रारदार तरुणी नवी मुंबईत राहत असल्याने निकाळजेला त्या शहरात प्रवेश करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

आवश्‍यकता असल्यास तपास अधिकाऱ्यांच्या मंजुरीनेच त्याला नवी मुंबईत प्रवेश देण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. या तरुणीने पनवेल पोलिस ठाण्यामध्ये निकाळजेच्या विरोधात बलात्काराची तक्रार नोंदवली आहे. मदत करण्याच्या बहाण्याने आणि लग्नाचे आमिष दाखवून त्याने माझ्यावर चार वर्षांपासून बलात्कार केला, असा दावा तक्रारीत केला आहे; मात्र तक्रारदाराबरोबर सहमतीने "लिव्ह इ'नमध्ये राहत होतो, असा बचाव निकाळजेच्या वतीने न्यायालयात केला आहे.

Web Title: deepak nikalaje no arrested high court