गुंगारा देत दीपिका पोहोचली NCB कार्यालयात; पण दीपिका होती कुठे?

सुमित बागुल
Saturday, 26 September 2020

दीपिका जेंव्हा NCB कार्यालयात पोहोचली तेंव्हा ती एका साध्या क्रेटा नामक गाडीतून आली.

मुंबई : बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री दीपिका पदुकोण मुंबईतील NCB कार्यालयात पोहोचलीये. सुशांत सिंह मृत्यूनंतर रिया आणि शोविकाच्या चौकशीतून जी माहिती समोर आलीये, जे व्हॅट्सऍप चॅट समोर आले आहेत त्यानंतर दिपीकासह सारा अली खान, श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंग आणि दीपिकाची मॅनेजर करिश्माला समन्स पाठवण्यात आलेले. काल दीपिकाची मॅनेजर करिश्माची चौकशी करण्यात आली. रकुलचीही काल चौकशी करण्यात आली होती.  त्यानंतर आज सकाळी दीपिका पदुकोण चौकशीसाठी हजार झालीये. विशेष म्हणजे चौकशीसाठी दाखल होताना दीपिकाने मिडिलाला गुंगारा देत, मीडियाचा ससेमिरा चुकवत NCB कार्यालय गाठलंय.

महत्वाची बातमी : बायको उचलतेय खर्च, खटला लढवण्यासाठी विकावे लागतायत दागिने, अनिल अंबानींचा कोर्टात दावा

दीपिका कशी पोहोचली NCB कार्यालयात ? 

दीपिका जेंव्हा NCB कार्यालयात पोहोचली तेंव्हा ती एका साध्या क्रेटा नामक गाडीतून आली. तिच्या भोवती कोणत्याही गाड्यांचा गराडा नव्हता काल रात्री दीपिका तिच्या घरी नव्हे तर हॉटेलमध्ये मुक्कामाला होती अशी माहिती आता समोर येतेय. जेंव्हा दीपिका गोव्यातील मुंबईत दाखल झाली तेंव्हा दीपिकाला मीडियाच्या गराड्याचा सामना करावा लागला. त्यानंतर आजही आपल्याला मीडियाच्या ससेमिऱ्याला सामोरं जावं लागू शकतो म्हणून दीपिका काल रात्रीच घर सोडलं होतं. त्यानंतर दीपिका NCB कार्यालयाच्या जवळच असलेल्या ताज हॉटेजमध्ये वास्तव्यास होती अशी शक्यता वर्तवली जातेय आणि तशी माहिती आता समजतेय. सकाळपासूनच ताज हॉटेल ते NCB कार्यालयापर्यंतचा रास्ता केवळ  मीडिया आणि पोलिसांसाठीच खुला होता. त्यावरून दीपिका ताजमध्ये वास्तव्यास होती अशी शक्यता वर्तवण्यात येतेय. सकाळी दहा वाजता दीपिकाची चौकशी सुरु झालीये. 

महत्वाची बातमी : NCB मार्फत आज दीपिकाची चौकशी, दीपिकाला कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार ?

दरम्यान, श्रद्धा कपूरही NCB कार्यालयात दाखल झालीये. श्रद्धा कपूरनेही माध्यमांना गुंगारा देत NCB कार्यालय गाठलंय.      

deepika padukon reached NCB office for questioning but where were deepika


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: deepika padukon reached NCB office for questioning but where were deepika