esakal | मुंबईच्या मुसळधार पावसात चक्क वाहत आलं हरीण, तासभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 'असं' मिळालं जीवदान
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबईच्या मुसळधार पावसात चक्क वाहत आलं हरीण, तासभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 'असं' मिळालं जीवदान

मुंबईत काल कोसळलेल्या मुसळधार पावसाने पशु-पक्षांनाही फटका बसला. मुसळधार पावसांमुळे पाण्याचा जोरदार प्रवाहात वाहून आलेले हरीण एका नाल्यामध्ये अडकले.

मुंबईच्या मुसळधार पावसात चक्क वाहत आलं हरीण, तासभराच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर 'असं' मिळालं जीवदान

sakal_logo
By
मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत काल कोसळलेल्या मुसळधार पावसाने पशु-पक्षांनाही फटका बसला. मुसळधार पावसांमुळे पाण्याचा जोरदार प्रवाहात वाहून आलेले हरीण एका नाल्यामध्ये अडकले. एक तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्या हरणाला वाचवण्यात प्राणीमात्रांना यश आले आहे. 

मुंबईत बुधवारी विक्रमी पाऊस कोसळला. दिवसभर मुंबईतील अनेक भागांत पाणी साचलं आणि नदी नाल्यांना पूर आला. अश्याच प्रकारे गोरेगाव पूर्वेला असलेल्या मोठ्या नाल्यात हरीण अडकलेले दिसले.आरे जंगलातील एका ओढ्यामध्ये ते हरीण सकाळी पडले असावे, त्यानंतर मुसळधार पावसामुळे ओढ्यातील पाण्याच्या वाढत्या प्रवाहासोबत ते पुढे पुढे सरकत गोरेगाव मधील नाल्यात पोहोचले असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय. एका नागरिकाने हा प्रकार पाहिल्यानंतर प्राणी संस्थेशी संपर्क केला. त्यानंतर त्या हरणाला वाचहवण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू झाले. 

मोठी बातमी - महाडमध्ये आजही मुसळधार पावसामुळे पुराची भीती कायम, दरड कोसळल्याने घरांचं नुकसान

हरणाला वाचवण्यासाठी प्राणी मित्र तातडीने दाखल झालेत. मात्र त्यावेळी पावसाचा जोर वाढलेला असल्याने हरणाला नाल्यातून बाहेर काढणे अवघड झाले झालेे होते. त्यासाठी काही अत्याधुनिक साधने आणि मनुष्यबळाची गरज असल्याने प्राणी मित्रांनी तातडीने वनविभागाच्या समन्वयाने एसएआरआरपी आणि रॉ संस्थेला संपर्क केला.

त्यानंतर पावसाचा जोर ओसरल्यानंतर त्या हरणाच्या बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली. तोपर्यंत ते हरीण नाल्यातील मॅनहोलमध्ये अडकले होते. मात्र पाण्याचा वेग अधिक वाढला असल्याने रेस्क्यू ऑपरेशन अधिक अवघड झालं. मात्र सर्व यंत्रणांनी 1 तासांचे शर्थीचे प्रयत्न करून त्या हरणाला  मॅनहोलमधून हरणाला बाहेर काढले. या दरम्यान हरणाला थोडी फार दुखापत झाल्याने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील बचाव केंद्रामध्ये त्याला दाखल केलं गेलं, तिथे त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मोठी बातमी - वाढदिवसाच्या निमित्तानं गृहनिर्माण मंत्र्यांकडून कौतुकास्पद कामगिरी करत केलं 'हे' आवाहन

मुसळधार पावसामुळे अनेकदा पशु-पक्षी ही बिथरतात. अश्यावेळी त्यांना मदतीची गरज असू शकते. असं पशु-पक्षी कुठे अडकलेले आढळण्यास कृपया प्राणी मित्र किंवा संघटनांना कळवा असं आवाहन प्राणीमित्र संतोष शिंदे यांनी केलंय. 

( संपादन - सुमित बागुल )

deer rescued from the manhole after heavy rainfall in mumbai