ठाणे - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुरबाड दौरा तीन तास उशिरा

मुरलीधर दळवी
शुक्रवार, 4 मे 2018

मुरबाड (ठाणे) : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यासाठी गुरुवारी (ता. 3) मुरबाडला भेट दिली. दुपारी 3 वाजता ठाकरे मुरबाड येथे येणार असे कार्यकर्त्यांनी सांगितले होते मात्र ते 6 वाजता आले त्यामुळे कार्यकर्ते हिरमुसले होते मुंबईतील कार्यकर्त्यांच्या सुचनेमुळे पत्रकारांनी या कार्यक्रमाचd/e ठिकाणाहून काढता पाय घेतला.

कार्यक्रमाच्या ठिकाणी स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या निमंत्रणानुसार दुपारी 3 वाजेपासून ताटकळत असलेल्या पत्रकारांना मनसे नेते बाळा नांदगावकर  व मुंबईच्या पदाधिकाऱ्यांनी चार वाजता भेटून साहेब उशिरा येणार असुन पक्षाच्या  पदाधिकाऱ्याशी  संवाद साधणार आहेत तुम्हाला थांबायचे  असेल तर  थांबा असे सांगत अप्रत्यक्षरीत्या तेथून निघून जाण्यास सांगितले व राज ठाकरे येतील तेव्हा तुम्हाला कळवू असे सांगितले त्यामुळे सर्व पत्रकारानी काढता पाय घेतला राज ठाकरे आले तेव्हा पत्रकारांना निरोप न दिल्याने तेथे एकही पत्रकार उपस्थित नव्हता.

राज ठाकरे यांचा शहापूर दौरा दुपारी दोन वाजता संपला होता त्यामुळे जेवण करून तीन वाजे पर्यंत ते मुरबाड येथे पोहचणे अपेक्षित होते परंतु ते का पोहचले नाहीत याची पत्रकारांनी चौकशी केली असता, साहेब विश्रांती घेत आहेत त्यामुळे उशिरा पोहोचतील असे सांगण्यात आले.

कार्यक्रम संपल्यानंतर मनसेचे मुरबाड शहर अध्यक्ष नरेश देसले यांनी पत्रकारांशी संपर्क साधून झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली व राज ठाकरे पुन्हा मुरबाड येथे येणार आहेत तेव्हा पत्रकारांना भेटेन असा संदेश दिला असल्याचे नरेश देसले यांनी पत्रकारांना  सांगितले पाडाळे येथील  धरणग्रस्त शेतकरी व मागच्या वर्षी आत्महत्या केलेले  शेतकरी अशोक देसले यांचे कुंटुबिंय याना राज ठाकरे पुढील दौऱ्याच्या वेळी भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: delay in visit to murbad by raj thackeray