Mumbai News: टोलनाका स्थलांतराचा वाद! कोंडी वाढण्याची भीती; मुख्यमंत्र्यांची घेणार भेट

Dahisar Toll Naka: दहिसर चेकनाका कोंडीच्या कारणावरून स्थलांतर करण्यात येणार आहे. मात्र या स्थलांतराला रहिवाशांनी विरोध केला असून यासंदर्भात नागरिकांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.
Dahisar Toll Naka

Dahisar Toll Naka

ESakal

Updated on

भाईंदर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील मुंबईचे प्रवेशद्वारावर असलेला दहिसर चेकनाका कोंडीच्या कारणावरून स्थलांतर करण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यवाही सुरू करण्याचे आदेश दिले असून, दिवाळीच्या आधी तो स्थलांतर होईल, अशी घोषणा परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी नुकतीच केली आहे, मात्र या स्थलांतराला घोडबंदर गावातील रहिवाशांनी विरोध केला आहे. या स्थलांतराने कोंडीच्या समस्येला तोंड द्यावे लागणार असल्याचा मुद्दा स्थानिकांनी उपस्थित केला आहे. यासंदर्भात नागरिकांचे एक शिष्टमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com