

From Delhi to Maharashtra: Youth Take to Streets Demanding Accountability in Education System
sakal
मुंबई : ‘नीट’ परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अन् सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषण अन् दिल्लीतील आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी आज विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. यावेळी मोर्चा, जोरदार निदर्शने करण्यात आली. या आंदोलनात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.