Mon, June 5, 2023

दिल्ली-शिर्डी विमानात तांत्रिक बिघाड, मुंबईत करावं लागलं लँडिंग
Published on : 19 May 2022, 4:30 pm
मुंबई : दिल्ली शिर्डी प्रवासादरम्यान स्पाईस जेटचे विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचा प्रकार समोर आला आहे, या मुळे विवानाचं शिर्डी एवजी मुंबईत उशिरा लँडिग करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे, विमानातील प्रवाशांना बसने शिर्डीला नेण्यात येणार आहे. यासाठी तांत्रिक बिघाड आणि खराब हवामानाचे कारण देण्यात आले आहे.
दिल्लीहून शिर्डीला येणारे स्पाईस जेटचे SG-953 विमान शिर्डीला न उतरवता ते मुंबईला नेण्यात आले त्यानंतर प्रवाशांना आता मुंबईतुन शिर्डीला बसमधून नेण्यात येणार आहे. साधारण पावणे पाच वाजता विमान मुंबईत उतरवण्यात आले.