नवी मुंबईत डिलिव्हरी बॉयलाही कोरोना, दिवसभरात 23 नवे रुग्ण

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 26 April 2020

शहरात आज तब्बल 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे.

नवी मुंबई : शहरात आज तब्बल 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका नामांकित कंपनीच्या डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाल्याने प्रशासनाच्या अडचणीत वाढ झाली आहे. शिवाय, एकाच घरातील नऊ जणांचाही यात समावेश आहे. आता नवी मुंबईतील कोरोनाची रुग्ण संख्या 131 वर गेली आहे.

मोठी बातमी ः राज्याची चिंता कायम! कोरोनाबाधितांची संख्या आठ हजारांवर

नवी मुंबई महापालिकेतर्फे पाठवलेले 164 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 141 रिपोर्ट निगेटिव्ह, तर 23 रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. नवी मुंबईत एकाच वेळेस 23 जणांना कोरोनाची लागण होण्याची ही आतापर्यंतची पहिली घटना आहे. भायखळा येथील रुग्णालयातील कोरोनाबाधित डॉक्टरच्या संपर्कात आल्यामुळे सीवूड्स सेक्टर 50 येथील एकाच कुटुंबातील नऊ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. 6 पुरुष आणि 3 महिलांचा यात समावेश आहे. सानपाडा सेक्टर 5 येथे राहत असणाऱ्या एका वृत्तवाहिनीच्या कॅमेरामन आणि त्याच्या गर्भवती पत्नीला कोरोनाची लागण झाली आहे. हा कॅमेरामन मुंबईत कामाला आहे. 

महत्वाची बातमी ः धारावीत कोरोना रुग्णांचा उच्चांंक; एका दिवसात रुग्णांची संख्येत मोठी वाढ

डिलिव्हरी बॉयमुळे प्रशासनाची डोकेदुखी
जुहूगांव सेक्टर 11 येथे राहणाऱ्या नामांकित कंपनीच्या 33 वर्षीय डिलिव्हरी बॉयला कोरोनाची लागण झाली आहे. 23 एप्रिलला त्याला तापाची लक्षणे जाणवल्यामुळे नमुने चाचणीसाठी पाठवले होते. आज अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याने मागील 14 दिवसांत विविध ठिकाणी डिलिव्हरी केलेल्या ठिकाणांची माहिती पालिका गोळा करत आहे. 

दिवसभरात सापडलेले रुग्ण
सीवूड्स 9
नेरूळ 4
वाशी 2
तुर्भे 4
कोपरखैरणे 2
घणसोली 2
एकूण 23


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: delivery boy of branded company gets corona in navi mumbai