तळिरामांनी काढली कसर...अवघ्या 24 तासात 5 हजार जणांना घरपोच मद्याची डिलीव्हरी

राहुल क्षीरसागर
Monday, 18 May 2020

मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली मद्यविक्री घरपोच स्वरुपात रविवारी सुरू करण्यात आली. त्यात केवळ परवाना धारकांनाच मद्याची घरपोच सेवा देण्यात येणार असल्यामुळे अनेक विनापरवाना धारकांचा हिरमोड झाला. असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीतून तळिरामांनी दोन महिन्याची कसर भरून काढल्याचे समोर आले. रविवारी मद्य विक्रीला सुरुवात होताच अवघ्या 24 तासात जिल्ह्यात 5 हजार 845 मद्याप्रेमींनी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी दिली. 

ठाणे : मागील दोन महिन्यांपासून बंद असलेली मद्यविक्री घरपोच स्वरुपात रविवारी सुरू करण्यात आली. त्यात केवळ परवाना धारकांनाच मद्याची घरपोच सेवा देण्यात येणार असल्यामुळे अनेक विनापरवाना धारकांचा हिरमोड झाला. असे असले तरी, दुसरीकडे जिल्ह्यात घरपोच मद्य विक्रीतून तळिरामांनी दोन महिन्याची कसर भरून काढल्याचे समोर आले. रविवारी मद्य विक्रीला सुरुवात होताच अवघ्या 24 तासात जिल्ह्यात 5 हजार 845 मद्याप्रेमींनी या सेवेचा लाभ घेतल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन घुले यांनी दिली.        

क्लिक करा : संपापेक्षा बेस्ट कर्मचाऱ्यांनी दिले सेवेला महत्त्व

ठाणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळून इतर भागात घरपोच मद्य विक्रीला ठाणे जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिल्यानंतर घरपोच मद्याविक्रीसाठी विक्रेत्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ओळखपत्र देण्यास सुरूवात केली.

सध्याच्या घडीला ठाणे जिल्ह्यात 190 मद्य विक्रीची दुकाने आहेत. त्यापैकी शनिवारी 40 तर रविवारी 53 असे एकूण 93 विक्रेत्यांना ओळखपत्र देण्यात आले. त्यानुसार आतापर्यंत 93 मद्य विक्रेत्यांचा घरपोच विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. 

oदरम्यान, 93 दुकानांपैकी 65 दुकाने उघडण्यात आली होती. तसेच सुमारे 50 टक्केच मद्य विक्रेत्यांना हे ओळखपत्र देण्यात आले आहे. या दुकानांमध्ये घरपोच मद्य पोहचविणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही ओळखपत्र तयार करण्यात आले आहेत. त्यांची संपूर्ण माहिती, डॉक्टरांचा तपासणी अहवाल पाहूनच त्यांना ओळखपत्र देण्यात येत आहे.

क्लिक करा : दबंग सलमानच्या नावाने कास्टिंग फसवणूक

घरपोच मद्यविक्री ही लघुसंदेश, व्हॉट्सअॅप आणि दूरध्वनीद्वारे करता येणार आहे. त्यात रविवारपासून घरपोच मद्य विक्रीची सेवा सुरू झाल्यापासून अवघ्या 24 तासात जिल्ह्यातील विविध भागातील 5 हजार 845 जणांनी या सेवेचा लाभ घेत रविवारचा दिवस सत्कारणी लावला. 

ऑनलाईन परवान्यासाठी झुंबड 
   ठाणे जिल्ह्यात मद्य परवानाधारकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सरकारने केवळ परवाना धरकांनाच मद्य विक्री करण्याचे निर्देश दिल्यामुळे अनेक परवाना नसलेल्या मद्यपींचा हिरमोड झाला होता. त्यामुळे परवाना नसलेल्या तळिरामांनी तात्काळ ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मोठी गर्दी केल्याची माहिती ठाणे राज्य उत्पादन विभागाच्यावतीने देण्यात आली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Delivery of liquor to 5,000 people in just 24 hours