मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका, खबरदारी घेण्याच्या 'BMC'ला सूचना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Delta plus virus

मुंबईत डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका, खबरदारी घेण्याच्या 'BMC'ला सूचना

मुंबई : कोरोना विषाणूचे बदलते स्वरुप (corona new variants) अधिक घातक असून मुंबईतही डेल्टा प्लस व्हेरिएंटचा (delta plus variant) शिरकाव झाला आहे. मुंबईत आतापर्यंत 6 रुग्ण आढळले असून मुंबई महापालिका (bmc) अलर्ट झाली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे वाढते रुग्ण पहाता राज्य सरकारने (Maharashtra government) ही मुंबई महापालिकेला (precautions) खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट नियंत्रणात आली असली तरी धोका कायम आहे. कोरोनाचा नवीन प्रकार डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्याने पालिका सतर्क झाली आहे. जून महिन्यात एका महिलेला डेल्टा प्लस व्हेरिएंटची लागण झाल्याचे समोर आले होते. आता डेल्टा प्लस व्हेरिएंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत असून राज्यात आतापर्यंत 45 रुग्ण आढळले आहेत. तर मुंबईतील डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांची संख्या 6 वर पोहोचली आहे. त्यामुळे, डेल्टा प्लस व्हेरिएंट तिस-या लाटेसाठी प्रमुख कारण ठरू शकते, असे मत आरोग्य तंज्ञांनी व्यक्त केले आहे.

हेही वाचा: BMC : शाळांसाठी कृती आराखडा तयार, निर्जंतुकीकरण करण्यासाठी सज्ज

मुंबईसारख्या शहरात विविध ठिकाणाहून लोक रोज ये - जा करत असल्याने याचा संसर्ग पसरू शकतो. एमएमआर क्षेत्रात डेल्टा प्लसचे रुग्ण आढळल्याने पालिकेने खबरदारी घेतली आहे. कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लस व्हेरिएंट रुग्णांच्या चाचण्या करण्यात येणार असून अमेरिकेतून 6 कोटी रुपयांची मशीन उपलब्ध केली आहे.

loading image
go to top