शिवसैनिकांचे खा. श्रीकांत शिंदेंकडे भुसावळ फास्ट एक्स्प्रेससाठी साकडे

दिनेश गोगी
सोमवार, 2 एप्रिल 2018

उल्हासनगर : उपनगरातील कल्याण-डोंबिवली-उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर-शहाड-टिटवाळा-तसेच ठाणे-मुंबई या शहरी भागात लाखोंच्या संख्येने  बांधव राहत आहेत. मात्र त्यांच्यासाठी एकही स्वतंत्र गाडी नसल्याने होणाऱ्या ससेहोलपटातून त्यांची सुटका करण्यासाठी मुंबई ते भुसावळ अशी सुपरस्टार एक्स्प्रेस नित्याने सुरू करावी, अशा मागणीचे साकडे शिवसैनिकांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना घातले आहे.

शिवसेना विभाग प्रमुख सुरेश सोनवणे, ग्राहक संरक्षण कक्षप्रमुख आदेश पाटील, शाखाप्रमुख सुरेश पाटील, प्रमोद पांडे, विल्सन डिसूझा, उपशाखाप्रमुख संदीप वंजारी यांनी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांना निवेदन देताना खान्देशच्या नागरिकांना कशा रितीने मरणाच्या गर्दीतून प्रवास करण्याची वेळ येते. यावर लक्ष वेधले. मुळात चाळीसगाव-पाचोरा-जळगाव आणि भुसावळ-धुळे हा भला मोठा पट्टा खान्देशचा परिसर म्हणून ओळखला जातो. या मार्गावरून अनेक एक्सप्रेस-सुपरफास्ट एक्सप्रेस उत्तरप्रदेश-मध्यप्रदेश-दिल्ली-कोलकता-भुवनेश्वर-हटीया-आसाम आणि नागपूर दिनेशे धावतात. मात्र नागपूर वगळता सर्वच गाड्या ह्या परप्रांतीय नागरिकांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या असल्याने या गाड्यांत पाय ठेवायलाही जागा मिळत नाही. त्यामुळे अनेक वेळेस भांडणे होतात.

विशेष म्हणजे या मार्गांवर सुट्ट्यांच्या कालावधीत विशेष गाड्या नित्याने सोडल्या जातात.दुर्दैवाने खान्देशच्या नागरिकांचा कधीच विचार करण्यात आलेला नाही.अशी खंत व्यक्त करताना खान्देशसाठी नित्याने दररोज मुंबई ते भुसावल सुपरफास्ट एक्सप्रेस सुरू करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करावा.अशी विनंती शिवसैनिकांनी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे केली.

तेव्हा मुंबई-दादर-कुर्ला-ठाणे-कल्याण येथून दररोज किती प्रवासी खान्देशसाठी प्रवास करतात त्यांची आकडेवारी काढण्याच्या सूचना डॉ.शिंदे यांनी शिवसैनिकांना दिल्या. मुंबई-दादर-कुर्ला-ठाणे-कल्याण-उल्हासनगर-अंबरनाथ-बदलापूर स्थानकावर तिकीट आरक्षणाची सुविधा आहे.या प्रत्येक स्थानकावर जाऊन खान्देशच्या प्रवाशांची माहिती घेऊन ती खा.डॉ.श्रीकांत शिंदे यांना देणार, असे विभागप्रमुख सुरेश सोनवणे यांनी सांगितले.

Web Title: demand for bhusawal fast express by shivsainik to mp shrikant shinde