धास्ती 'बर्ड फ्लू'ची; चिकनसह अंड्याची मागणी घटली

मिलिंद तांबे
Tuesday, 12 January 2021

'बर्ड फ्ल्यू' संसर्गाच्या भीतीचा फटका अंडा उत्पादकांना ही बसला असून अंड्याचे दर 20 पैश्याने कोसळले आहेत

मुंबई, ता. 12 : 'बर्ड फ्ल्यू' संसर्गाचा परिणाम चिकन तसेच अंड्याच्या मागणीवर झाला असून दैनंदिन मागणीत 25 ते 30 टक्क्यांची घट झाली आहे. पोल्ट्री फार्मवर 2 किलोची कोंबडी साधारणतः 86 रुपयांना विकली जायची. त्यात मोठ्या प्रमाणात घट झाली असून दर 50 रुपयांपर्यंत खाली आला आहे. शेतकऱ्याला किलोमागे 12 रुपयांचा फटका बसत आहे अशी माहिती सिद्धिविनायक पोल्ट्री फार्मचे संचालक अजय देशपांडे यांनी दिली.

'बर्ड फ्ल्यू' संसर्गाचा भीती देखील शेतकऱ्यांना सतावू लागली आहे. त्यामुळे शेतकरी आपल्या पोल्ट्री फार्ममधील माल मिळेल त्या भावात काढण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दोन दिवसांपासून शेतकरी अगदी 11 ग्राम वाजनाची कोंबडी देखील विकत असल्याचे ही देशपांडे यांनी सांगितले. 

Bird Flue in Mumbai |मृत कावळ्यांना लागण; कच्चे मांस आणि कच्ची अंडी न खाण्याचे आवाहन

गेल्या दोन दिवसांपासून चिकनची मागणी घटल्याने पुरवठा वाढला आहे. पर्यायाने किरकोळ बाजारात देखील चिकन चे दर कोसळले असून साधारणता 150 ते 180 रुपये असणारा दर 120 ते 130 रुपयांवर आला आहे. पुढील काही दिवसांत संसर्गाचा भय वाढल्यास पोल्ट्री व्यवसायाला याचा मोठा फटका बसण्याची भीती ही देशपांडे यांनी व्यक्त केली.

घाऊक बाजारात अंड्याचे दर कमी झाल्याने किरकोळ बाजारातही दर कमी करणे आवश्यक आहे. किरकोळ बाजारात दर कमी झाले तर अंडयाचा खप वाढेल. त्यामुळे शेतकऱ्यांचे होणारे अधिकचे नुकसान टाळता येईल, असं सिद्धिविनायक पोल्ट्री फार्मचे मालक अभय देशपांडे यांनी सांगितलं 
 

अंड्याचे दर 20 पैशांनी कोसळले

'बर्ड फ्ल्यू' संसर्गाच्या भीतीचा फटका अंडा उत्पादकांना ही बसला असून अंड्याचे दर 20 पैश्याने कोसळले आहेत. त्यामुळे घाऊक बाजारात डझनामागे अंड्याचा दर 54 रुपयांवरून 51 रुपये 60 पैसे इतका खाली आला आहे. 

मुंबई, रायगड, ठाणे, पालघर परिसरातील बातम्यांचा आढावा घेण्यासाठी येथे क्लिक करा

होलसेल बाजारात 100 अंड्यांचा दर 450 रुपये होता.गेल्या दोन दिवसात अंड्याचे दर कोसळायला सुरुवात झाली असून शेकड्या मागे 403 रुपयांपर्यंत खाली आला आहे. अंड्याचा दर 4 रुपये 30 पैसे इतका खाली आला आहे. 

'बर्ड फ्ल्यू' संसर्गाचा फटका अंड्याच्या मागणीला ही बसला आहे. अंड्याची मागणी 25 ते 30 टक्क्यांनी घसरली आहे. त्यामुळे अंड पुरवठा दारांमध्ये सध्या चिंतेचे वातावरण आहे. मात्र अंड हे साधारणता 3 महिने शीतगृहात ठेवता येणे शक्य असल्याने अनेक उत्पादक तो पर्याय निवडण्याची शक्यता आहे. 

Health Alert | मुंबईत तापमानासह प्रदूषणाची पातळी वाढल्याने 'हेल्थ अलर्ट' जारी

किरकोळ बाजारात चढे दर

अंड्याची मागणी तसेच घाऊक बाजारातील दर कमी झाले असले तरी किरकोळ बाजारात आजही अंडे चढ्या दराने विकले जात आहे. किरकोळ बाजारात एक अंड 7 रुपये तर एक डझन अंडे 80 रुपयांना विकले जात आहे.

demand for chicken and eggs dropped by twenty to twenty five percent


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: demand for chicken and eggs dropped by twenty to twenty five percent