तापमानवाढीमुळे राज्यात विजेची मागणी वाढली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

मुंबई : राज्यातील तापमानात वाढ आणि शेती पंपांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे विजेच्या मागणीत बुधवारी (ता. 19) विक्रमी वाढ झाली. विजेची मागणी मागील ऑक्‍टोबरच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांनी आणि आतापर्यंत नोंद झालेल्या कमाल मागणीपेक्षा 825 मेगावॉटने जास्त होती. 

बारावीचा निकाल मे च्या अखेरिस लागणार, वाचा संपुर्ण बातमी

मुंबई : राज्यातील तापमानात वाढ आणि शेती पंपांकडून मागणीत वाढ झाल्यामुळे विजेच्या मागणीत बुधवारी (ता. 19) विक्रमी वाढ झाली. विजेची मागणी मागील ऑक्‍टोबरच्या तुलनेत 18 टक्‍क्‍यांनी आणि आतापर्यंत नोंद झालेल्या कमाल मागणीपेक्षा 825 मेगावॉटने जास्त होती. 

बारावीचा निकाल मे च्या अखेरिस लागणार, वाचा संपुर्ण बातमी

मागील वर्षी राज्यात मुसळधार पाऊस झाला, थंडीनेही विक्रम नोंदवला. फेब्रुवारी सुरू होताच राज्यातील तापमानात वाढ होऊ लागली. दोन दिवसांपूर्वी तापमान 38 अंश सेल्सिअसवर गेले होते. त्यामुळे विजेच्या मागणीत वाढ होऊ लागली आहे. महावितरणकडे 19 फेब्रुवारीला 21 हजार 570 मेगावॉट विजेच्या मागणीची नोंद झाली. मागील वर्षी 23 ऑक्‍टोबरला 20 हजार 745 मेगावॉट एवढी कमाल वीजमागणी नोंदवण्यात आली होती. विजेची मागणी गेल्या वर्षीच्या तुलनेत बुधवारी 3320 मेगावॉट म्हणजे 18 टक्‍क्‍यांनी जास्त होती. 

ही बातमी वाचली का - 4 वर्षापासून शवागारात 46 मृतदेह

हवामानातील बदल व शेती पंपांसाठी लागणाऱ्या विजेच्या मागणीतील वाढ या कारणांमुळे विजेची मागणी वाढल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. महावितरणने महानिर्मिती कंपनीकडून 7,853 मेगावॉट, एनटीपीसी व एनपीसीआयएल यांच्याकडून 4134 मेगावॉट, अदानी पॉवर, रतन इंडिया, सीजीपीएल, जेएसडब्ल्यू, एम्को आदी प्रकल्पांतून 4567 मेगावॉट वीज घेतली. त्याचप्रमाणे सौरऊर्जा प्रकल्पांतून 1864 मेगावॉट, पवनऊर्जा प्रकल्पांतून 156 मेगावॉट व सहवीजनिर्मिती प्रकल्पांमधून 912 मेगावॉट अशी एकूण 2932 मेगावॉट वीज घेण्यात झाली. 

 

मार्च आणि एप्रिल या महिन्यांतील अपेक्षित विजेची मागणी लक्षात घेऊन महावितरणने कंपन्यांकडून वीज खरेदी करण्याबाबत नियोजन केले आहे. मागणी असेल त्यानुसार कंपन्यांकडून वीज खरेदी करून ग्राहकांची मागणी पूर्ण करण्याची तयारी महावितरणने केली आहे. 
- अनिल कांबळे, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The demand for electricity in the state increased due to warming