बारावीचा निकाल लागणार 'मे'च्या अखेरीस! वाचा संपुर्ण बातमी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 20 फेब्रुवारी 2020

राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बारावीचे निकाल 28 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आले होते.

मुंबई -  राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात येत असलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिण्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी बारावीचे निकाल 28 मे रोजी ऑनलाईन पद्धतीने जाहीर करण्यात आले होते. राज्यात 18 फेब्रुवारी पासून बारावीच्या परिक्षा सुरू झाल्या आहेत. ह्या परिक्षा 20 मार्चपर्यंत पुर्ण होणार आहेत. परिक्षा पुर्ण झाल्यानंतर पेपर तपासणीसाठी मंडळाकडे पाठवले जातात.

भिंतीवर सुसाईड नोट लिहून सेवा निवृत्त शिक्षकाची आत्महत्या

यंदाच्या परिक्षेचाही निकाल 28 मे ला दुपारी 1 वाजता लागणार असल्याच्या शक्यता आहे. ही परिक्षा शैक्षणिक आयुष्यातील महत्वाचा टप्पा मानला जातो. विद्यार्थ्यांसोबत पालकांना देखिल या परिक्षेची चिंता असते.
बारावीची परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 12 लाख 5 हजार 27 एवढी आहे. विज्ञान, वाणिज्य कला आणि एमसीव्हीसी विभागाचे विद्यार्थी ही परिक्षा देणार आहेत. मुंबई विभागात तब्बव 3 लाख 39 हजार विद्यार्थी आहेत. इतर विद्यार्थी पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागातील असणार आहे. राज्यातील
8 लाख 53 हजार विद्यार्थी तर 6 लाख 61 हजार विद्यार्थीनी ही परिक्षा देणार आहेत.

त्याने बिअरची बाटली फोडली आणि स्वतःच्याच गळ्याला...

परिक्षेसाठी प्रत्येक जिल्ह्यात एक समूपदेशक नेमण्यात आले आहे. तर त्यांचे समन्वय ठेवण्यासाठी राज्यभरात 10 समूपदेशक नेमण्यात आले आहे. राज्यभरातील परिक्षा केद्रांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस आणि 273 भरारी पथके नेमण्यात आली आहेत. 
यापरिक्षेचा निकाल मे महिण्याच्या अखेरच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: XII results will be in end of May