दादर रेल्वे स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी

महापरिनिर्वाण दिनी राज्यातील विविध भागासह देशभरातून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने दादरच्या चैत्यभूमीवर येतात.
Dadar
DadarSakal

मुंबई : अनेक वर्षांपासून दादर स्थानकाचे नामांतर करण्याची मागणी जोर धरून आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी, (ता.6) डिसेंबर रोजी दादर रेल्वे स्थानकाबाहेर भीम आर्मीने आंदोलन केले. दादर रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी भीम आर्मीने केली आहे. आंदोलकांनी आधी दादर स्थानकासमोर आंदोलन केले. त्यानंतर घोषणाबाजी करत रेल्वे स्थानकात शिरण्याचा प्रयत्न केला.

सुरुवातीला पोलिसांनी या आंदोलकांना रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती चिघळू नये, यासाठी कडक पोलीस बंदोबस्तात दादर स्थानकातील पुलावरुन आंदोलन करण्याची परवानगी दिली. दादर स्थानकाच्या नामांतराचे पोस्टर हातात घेऊन यावेळी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. महापरिनिर्वाण दिनी राज्यातील विविध भागासह देशभरातून आंबेडकर अनुयायी मोठ्या संख्येने दादरच्या चैत्यभूमीवर येतात. यासाठी ते दादर रेल्वे स्थानकातच उतरतात. त्यामुळेच या रेल्वे स्थानकाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर भीम आर्मीने आंदोलन करत स्थानकाच्या नावाचे पोस्टर ठिकठिकाणी लावण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com