नवी मुंबई पालिका कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 4 ऑगस्ट 2019

नवी मुंबई महपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्त आबासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई ः नवी मुंबई महपालिका क्षेत्रात स्वच्छ भारत सर्वेक्षणासाठी काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी पालिका आयुक्त आबासाहेब मिसाळ यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

संत गाडगेबाबा स्वच्छता अभियान ते स्वच्छ भारत सर्वेक्षण यात नवी मुंबई महापालिकेस प्रथम क्रमांकासहित सर्वोत्तम स्थान मिळवून देण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश पाळत पालिका कर्मचारी दैनंदिन कामांच्या व्यतिरिक्त सकाळी ५ वाजता शहरात हागणदारी मुक्तीसाठी गुड मार्निग पथकाचे काम, तर सायंकाळी ८ वाजता शहरातील साफसफाई पाहणीपर्यंत दिवसभरातील १२ ते १५ तास काम करतात. दिलेले काम करत असताना स्वतःचे स्वास्थ्य, कुटुंब, सणवार किंवा हक्काची साप्ताहिक सुट्टी विसरून शहराचा स्वच्छतेत प्रथम क्रमांक कसा येईल, यासाठी मेहनत घेत असतात. 

मात्र, स्वच्छ भारतमध्ये नंबर पटकावल्यांनतर कर्मचाऱ्यांचा गौरव केला जात नाही; तर संवर्गास पदोन्नती व वाढीव वेतनवाढीचे केवळ आश्‍वासन दिले जाते. असा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. त्यामुळे नवी मुंबई शहराच्या सन्मानासाठी रोज १२ ते १५ तास काम करणाऱ्या कर्मचारी, अधिकाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची मागणी नवी मुंबई महापालिका कर्मचारी, अधिकारी संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Demand for Incentive Allowance for Navi Mumbai Municipal Employees