मुरबाड नगर पंचायती विरोधात धरणे आंदोलन निवेदन 

 मुरलीधर दळवी
शुक्रवार, 30 नोव्हेंबर 2018

मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर पंचायत कार्यालयात यावे लागले.

मुरबाड (ठाणे) मुरबाड नगर पंचायती विरोधात शिवसेनेतर्फे शुक्रवारी ता 30 आयोजित करण्यात आलेल्या धरणे आंदोलनाचे निवेदन स्वीकारण्यासाठी नगर पंचायतीचा एकही अधिकारी वा पदाधिकारी उपस्थित न राहिल्याने शेवटी मुरबाडचे तहसीलदार सचिन चौधर याना निवेदन स्वीकारणेसाठी नगर पंचायत कार्यालयात यावे लागले.

शिवसेना मुरबाड शहर अध्यक्ष राम दुधाळे यांनी नगर पंचायतीच्या मनमानी कारभार व भ्रष्टाचाराचे विरोधात 30 नोव्हेबर रोजी धरणे आंदोलन करणार असल्याचे पत्र दिले होते. या आंदोलनासाठी ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख व महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, ठाणे जिल्हा परिषदेच्या बांधकाम समितीचे सभापती बाळूमामा म्हात्रे, मुरबाड विधानसभा संघटक मधुकर घुडे, तालुका अध्यक्ष कांतीलाल कंटे, यांचेसह शिवसेना कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

नेत्यांची भाषणे सुरु झाली व निवेदन कोण स्विकारणार याविषयी पोलिसांनी चौकशी करण्यास सुरुवात केली. असता मुख्याधिकारी पंकज भुसे व कार्यालय अधीक्षक संदीप कांबळे दोघेही गैरहजर असल्याचे कळले शेवटी तहसीलदार तेथे आलें त्यांनी निवेदन स्वीकारल्या नंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

धरणे आंदोलनास उपस्थित बसलेल्या ठाणे जिल्हा शिवसेना प्रमुख प्रकाश पाटील यांनी नगर पंचायतीने भ्रष्टाचार केला. असल्याने व राम दुधाळे यांनी केलेल्या तक्रारीचे उत्तर नसल्याने अधिकारी पळून गेल्याची टीका केली. या बाबत ठाणे जिल्हा पालक मंत्री व ठाणे जिल्हाधीकारी यांचेकडे तक्रार करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मुरबाड नगर पंचायतीचे मुख्याधिकारी रजेवर असल्याचे तर कार्यालय अधीक्षक गुरुवार पासून गैरहजर असल्याने नगर पंचायतीचा कार्यभार नेमका कोणाकडे होता तसेच अधिकाऱ्यांचा हजेरी पट नेमका कुठे असतो याची चौकशी करावी अशी मागणी संतप्त शिवसैनिक करत होते

Web Title: Demand for protest against Murbad Nagar Panchayat