उल्हासनगर पालिकेत डंपिंग ग्राऊंड हटवण्याचा नारा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 21 जुलै 2018

उल्हासनगर : कॅम्प नंबर 1 परिसरात म्हारळच्या हद्दीत असलेले डंपिंग ग्राऊंड ओव्हरफ्लो झाल्याने उल्हासनगर पालिकेने कॅम्प नंबर 5 च्या भागात दुसरे डंपिंग ग्राऊंड तयार केले आहे.या ग्राऊंडवर कचरा पेटवण्यात येत असल्याने त्याच्या उग्र वासाने नागरिकांना श्वास घेणे कठीण होऊन बसले आहे.

त्याचे पडसाद काल रात्री 8 वाजेपर्यंत चाललेल्या उल्हासनगर पालिकेच्या महासभेत उमटले असून सर्वपक्षीय नगरसेवकांनी डंपिंग हटावण्याचा नारा दिला आहे. त्यांनी हातात स्लोगन झळकवून आंदोलन केले.

नगरसेवक सुनील सुर्वे, विजय पाटील यांनी डंपिंगचा मुद्दा लक्षवेधीद्वारे उपस्थित केला होता.त्यास सतरामदास जेसनानी,किशोर वनवारी,राजेंद्र चौधरी,धनंजय बोडारे,अरुण आशान,शेखर यादव,राजेश वानखेडे,शेरी लुंड,भारत गंगोत्री,प्रमोद टाले,टोनी सिरवानी,कंचन लुंड,मिनाक्षी पाटील,सुनीता बगाडे,सुमन सचदेव,सविता तोरणे-रगडे आदींनी घोषणाबाजी करत आणि हातात स्लोगण घेत डंपिंग हटाव चा णारा दिला.

काही नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले. मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी जागेचा शोध सुरू असून ती मिळताच डंपिंग बंद करण्यात येणार असे सांगितले.पण नगरसेवकांनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर आणि उशीर होत आल्याने महासभा तहकूब करण्यात आली.दोन वर्षांपूर्वी हे डंपिंग बंद करण्यासाठी शिवसेनेने कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे,खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग समिती चार वर मोर्चा काढला होता.
दरम्यान डंपिंग हटवण्यासाठी कॅम्प 5 परिसरात वज्र मूठ ही संघटना स्थापन करण्यात आली आहे.त्यात नगरसेवक सतरामदास जेसनानी, शशिकांत दायमा,राजकुमार कुकरेजा,राजेश चांगलानी,निखिल गोळे,अनुष्का शर्मा,आशा चौधरी,मोनिका दुसेजा आदींचा समावेश असून काल महासभेच्या वेळी पालिकेच्या बाहेर या संघटनेच्या वतीने देखील हातात स्लोगन घेऊन मूक आंदोलन करण्यात आले.

Web Title: demand for removing dumping ground in ulhasnagar