नवी मुंबईत महिलांसाठी हवीत ‘ती’ टॉयलेट

नवी मुंबईत महिलांसाठी हवीत ‘ती’ टॉयलेट
नवी मुंबईत महिलांसाठी हवीत ‘ती’ टॉयलेट

नवी मुंबई : पुणे आणि मुंबई महापालिकेने परिवहनच्या ताफ्यातील जुन्या बसचे रूपांतर महिलांसाठीच्या स्वछतागृहात केले आहे. मुंबईत मरीन ड्राइव्ह येथे सुरू करण्यात आलेले महिलांसाठीचे अद्ययावत प्रसाधनगृहे पाहता नवी मुंबईतही अशाच प्रकारे माहिलांसाठी ‘ती’ टॉयलेट उपलब्ध करावे, अशी मागणी करण्यात येत आहे.

पुण्यात जानेवारीच्या सुमारास; तर मुंबईत नोव्हेंबरमध्ये मरीन ड्राईव्ह येथे जुन्या बसमध्ये ‘ती’ टॉयलेट सुरू झाले. या प्रसाधनगृहात सॅनिटरी नॅपकिन डिस्पेन्सर, ब्रेस्टफीडिंग स्टेशन, सोलर लाईट्‌स, पॅनिक बटन, वायफाय अशा सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पुण्यातील सारा प्लास्ट इंडिया लिमिटेड या कंपनीने याची रचना केली आहे. नवी मुंबईतही कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांसाठी अशा सुविधेची आवश्‍यकता असल्याचे मत व्यक्त करण्यात येत आहे. दिल से नवी मुंबई संस्थेने (ऑनलाईन व्यासपीठ) ही कल्पना नुकतीच आयुक्तांसामोर मांडली. या संकल्पनेला आयुक्त मिसाळ यांनीही सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. याबाबत दिल से नवी मुंबई संस्थेचे प्रमुख बी. एन. कुमार म्हणाले, की नवी मुंबई नियोजित शहर असल्याचे म्हटले जाते, परंतु येथे महिलांसाठीच्या स्वछतागृहांची संख्या फारच कमी आहे. जी काही स्वछतागृह आहेत ती बऱ्याचदा स्वच्छ नसतात किंवा त्यांच्या चहुबाजूंनी कचऱ्याचे साम्राज्य पसरलेले असते. वाशी मार्केट सेक्‍टर १५ येथील स्वछतागृह त्याचे चांगले उदाहरण आहे. समता महिला मंडळाच्या अध्यक्ष फुलन शिंदे यांनीदेखील दिल से नवी मुंबईची ही मागणी योग्य असल्याचे म्हटले आहे. कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांची स्वच्छ प्रसाधनगृह नसल्याने कुचंबणा होते. शिवाय अस्वच्छ टॉयलेट्‌सच्या वापरामुळे महिलांच्या आरोग्यासही धोका निर्माण होत असल्याचे शिंदे यांनी अधोरेखित केले.

कार्यालयीन कामकाज उरकून घरी परत येत असताना रेल्वे स्थानक व बस डेपोत असलेल्या अस्वच्छ स्वछतागृहमध्ये जावे लागते. अनेकदा तेथील तुंबलेली, घाणेरडी टॉयलेट पाहून धावत पळत घर गाठावे लागते.
- विजयालक्ष्मी, कोपरखैरणे.

महाविद्यालयांमधील स्वछतागृह बऱ्याचदा खराब असतात. दुर्गंधी, अस्वच्छतेमुळे रेल्वे स्थानकांमधील स्वछतागृहांचीही तीच गत आहे. महिलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह असणे आवश्‍यक आहे.
- वैष्णवी चव्हाण, महाविद्यालयीन विद्यार्थिनी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com