दादर-माहीम नाल्यावरील संरक्षक भिंतदुरुस्तीची मागणी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 4 डिसेंबर 2018

धारावी - धारावीतून 60 फुटी संत कबीर मार्ग येथील दादर-माहीम नाल्याची संरक्षक भिंत जागोजागी ढासळली आहे. पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भिंतीच्या जागी उभारलेले पत्रेही तुटून पडले आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यानंतर नाला पुन्हा गाळ व कचऱ्याने तुडुंब भरल्यामुळे नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये दुर्गंधी पसरून कीटक, डासांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घरात एक व्यक्ती आजारी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे.

धारावी - धारावीतून 60 फुटी संत कबीर मार्ग येथील दादर-माहीम नाल्याची संरक्षक भिंत जागोजागी ढासळली आहे. पालिकेने तात्पुरत्या स्वरूपात भिंतीच्या जागी उभारलेले पत्रेही तुटून पडले आहेत. त्यामुळे एखादा मोठा अपघात होण्याची दाट शक्‍यता वर्तवली जात आहे. पावसाळ्यानंतर नाला पुन्हा गाळ व कचऱ्याने तुडुंब भरल्यामुळे नाल्यालगतच्या वस्त्यांमध्ये दुर्गंधी पसरून कीटक, डासांचा त्रास वाढला आहे. त्यामुळे येथील प्रत्येक घरात एक व्यक्ती आजारी असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यामुळे पालिकेच्या अधिकारी व लोकप्रतिनिधींनी लवकरात लवकर नाल्याची सफाई करून घेऊन संरक्षक भिंतीची दुरुस्ती करून घ्यावी, अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. 

60 फुटी रस्त्यावरील हा नाला कुंभारवाडा, लेबर कॅम्प, शाहूनगर, छोटा सायन विभागातील सांडपाणी वाहून नेतो. हा नाला एका बाजूला माहीम खाडीला; तर दुसरीकडे दादर चौपाटीला जाऊन मिळतो. नाल्याच्या दुरुस्तीकडे व साफसफाई करण्याकडे ग / उत्तर विभागाचे अधिकारी लक्ष देत नसल्याबद्दल स्थानिक रहिवासी संताप व्यक्त करीत आहेत. 

Web Title: Demand for wall repairing in dharavi

टॅग्स