Ganeshotsav 2023 : गणेशोत्सव मंडळांच्या मागण्यांची पूर्तता होणार; प्रशासनाचे बैठकीत आश्वासन

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहेत
demands of Ganeshotsav Mandals will fulfilled assurance in administration meeting mumbai
demands of Ganeshotsav Mandals will fulfilled assurance in administration meeting mumbaiSakal
Updated on

मुंबई - यंदाच्या गणेशोत्सवाच्या दरम्यान विसर्जन मार्गावरील खडडे बुजवण्यात यावेत, जाहिराती शुल्कात सवलत, मोफत पार्किंगची सुविधा कृत्रिम तलावांत वाढ करावी आदी मागण्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी पालिका प्रशासनाकडे केल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील गणेशोत्सव मंडळांची पालिका प्रशासनसोबत झालेल्या बैठकीत मंडळांच्या समस्या सोडवल्या जातील असे आश्वासन प्रशासनाने दिल्याची माहिती मंडळांकडून देण्यात आली.

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आगामी गणेशोत्सवाच्या तयारीला लागली आहेत. उत्सवा दरम्यान मंडळांच्या समस्या सोडवण्याबाबत चर्चा करण्यासाठी मंगळवारी मुंबईतील सार्वजनिक मंडळांच्या पदाधिका-यांसोबत पालिका अधिका-यांची बैठक झाली.

demands of Ganeshotsav Mandals will fulfilled assurance in administration meeting mumbai
Mumbai : विधिमंडळाच्या कामकाजात 'या' आमदारांचा सर्वाधिक सहभाग; प्रजा फाऊंडेशनचा प्रगती पुस्तकातून निष्कर्ष

यावेळी आमदार अजय चौधरी व काही लोकप्रतिनिधीही उपस्थित होते. गणेशोत्सवाआधी गणेश विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात यावेत, गणेशोत्सव मंडळांना डिजिटल जाहिराती लावण्याकरता देण्यात येणाऱ्या परवानगी शुल्कात सवलत देण्यासंदर्भात तातडीने प्रस्ताव महापालिका आयुक्तांकडे पाठवण्यात यावा,

गणेशोत्सवा दरम्यान सार्वजनिक वाहन तळात गणेश भक्त व स्थानिक नागरिकांकडे मोफत पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात यावा, गणेश मूर्ती विसर्जना करता कृत्रिम तलावांची संख्या वाढवण्यात यावीत,

demands of Ganeshotsav Mandals will fulfilled assurance in administration meeting mumbai
Mumbai Rain Update : पावसाची उघडीप तरीही खड्डे जैसे थे... अधिकाऱ्यांवर समाज माध्यमातून टिकेची झोड

शाडू मातीची मूर्ती बनवणाऱ्या मूर्तिकारांना; महापालिकेच्या वतीने शाडूची माती मोफत पुरवण्यात यावी या मंडळांनी केलेल्या मागण्या पूर्ण केल्या जातील असे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले असल्याची माहिती मंडळाच्या पदाधिका-यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.