esakal | लोकशाही हरवली..बसवरील त्या संदेश फलकाने पुन्हा वेधलं लक्ष
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

लोकशाही हरवली ? बसवरील त्या संदेश - फलकाने पुन्हा वेधलं लक्ष

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज

डोंबिवली : - कोरोनाच्या (Corona) नावाखाली प्रशासनाचा मनमानी कारभार सुरू आहे. प्रशासनाने (Corona) सांगायचं तसे नागरिकांनी वागायचे. लोकशाहीचा (Democracy) मूळ आधार जनता आहे, मात्र त्यांना विचारात घेऊन निर्णय घेत जात नाहीत. म्हणूनच मार्च 2020 पासून लोकशाही हरवली आहे अशी टीका ज्येष्ठ शिक्षणतज्ञ विवेक पंडित (Vivek Pandit) यांनी केली.

'लोकशाही हरवली' असल्याचे फलक विद्या निकेतन शाळेच्या बसवर झळकत असून पुन्हा एकदा या फलकांच्या माध्यमातून पंडित यांनी सत्य समाजासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वी 'डोंबिवली एक सोशिक शहर' आणि 'आठवण शाळा बंद आहेत' असे संदेश देणारे फलक बसवर लावत प्रशासनाचा मनमानी कारभार थांबवण्यासाठी आपल्या लेखणीतून विरोध दर्शविला आहे.

Mumbai

Mumbai

कोरोना संक्रमनामुळे सारे काही थांबले होते, मात्र आता हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येत आहे. नियमानुसार का होईना सारे काही सुरू झाले आहे, पण शाळा, कॉलेज अजून सुरू झाले नाहीत. कोरोना काळात लोकप्रतिनिधींची मुदत संपल्याने प्रशासनाच्या हाती सर्व कारभार गेला आहे. लोकशाहीचा मुळ आधार जनता आहे, मात्र त्यांना कोणी काहीच विचारत नाही. लोकांना काय वाटते, त्यांनी काय करायचे हे प्रशासन लोकमत विचारात न घेताच ठरवत आहे. आम्ही सांगतो तसे तुम्ही वागा असे सुरू आहे. आज शासकीय कार्यालयात नगण्य कोणी असेल तर तो सर्वसामान्य माणूस आहे. आम्हाला बोलू द्या, आमचे आवाज ऐका, लोकांचे हे म्हणणे प्रशासनाला समजण्यासाठी आम्ही तसे फलक लावलेत. शहरात रस्ते, पाणी, वीज, वाहतूक कोंडी आदी सारे प्रश्न जसेच्या तसे आहेत.

हेही वाचा: 'शासकीय कर्मचाऱ्यांना हक्काचे घर द्या'; महिलांचा धडक मोर्चा

शाळा म्हणजे केवळ शिकवणे नाही तर समाज घडविणे असे आपण बोलतो. तर समाजातील काही गोष्टींना वाचा पण फोडता आली पाहिजे. लेखणी हे शस्त्र तलवारी पेक्षाही धारदार असून त्याद्वारे आम्ही आवाज उठविण्याचा प्रयत्न केला असल्याचे ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व संरक्षण विभागातील निवृत्त अधिकारी विवेक पंडित यांनी सांगितले.

यापूर्वीही कोरोना काळात शाळा बंद होऊन वर्षपूर्ती झाली तेव्हा 'आठवण' या शिर्षकाखाली भय इथले संपत नाही, शाळा काही उघडत नाही. मॉल उघडले, बार गजबजले, पण शाळांना परवानगी नाही अशा आशयाची कविता प्रसिद्ध केली होती. तसेच 'जागतिक सोशिक दिनी डोंबिवली शहराची सोशिक शहर म्हणून निवड होणार. याकडे लक्ष वेधत सामाजिक समस्या, बेफिकीर प्रशासन, महागाई....या सर्वांना नेहमीच अत्यंत शांतपणे व समंजसपणे सहन करता या शहराने एक आदर्श निर्माण केला आहे. त्याबद्दल अभिनंदन करणारे फलक झलकवले होते.

loading image
go to top