
ठाणे : पावसाने दडी मारताच डेंग्यू, मलेरियाने डोके वर काढले आहे. ठाणे पालिका क्षेत्रामध्ये गेल्या पंधरा दिवसांमध्ये डेंग्यूचे ८८ तर मेलेरियाचे ५८ रुग्ण आढळले आहेत. ठाणे जिल्हा रुणालयातही जून ते जुलै १६ पर्यंत एकूण मलेरियाचे ११५ तर डेंग्यूचे ८४ रुग्ण आढळले आहेत. मलेरिया, डेंग्यूचा डंक वाढत असताना ठाणे शहारासह जिल्ह्यात ससंर्गजन्य ताप, काविळचे रुग्णही वाढत आहेत. त्यामुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांमध्ये गर्दी वाढली आहे.