
ठाणे : पावसाळ्यात दूषित पाणीपुरवठा आणि डासांच्या उपद्रवामुळे साथीचे आजार बळावतात. पावसाळ्यात ठिकठिकाणी साचणारे पाणी, कचऱ्याचे ढीग यामुळे साथीचे आजार डोके वर काढण्यास सुरुवात करतात. ऊन-पावसाच्या खेळामुळे साथीच्या आजाराचे रुग्णदेखील वाढत आहेत. सध्या डेंग्यू, मलेरिया, अतिसार यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढले आहेत. मागील २६ दिवसांत ठाणे पालिका क्षेत्रातील खासगी व पालिका रुग्णालयांत डेंग्यूचे ६५, तर मलेरियाचे ५५ रुग्ण आढळून आल्याची माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.