WHO नेही व्यक्त केली भीती, कोरोना संसर्गाचा दंत डॉक्टरांना सर्वाधिक धोका

भाग्यश्री भुवड
Tuesday, 18 August 2020

कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असलेले दंतवैद्यक दवाखाने हळूहळू सुरु झाले आहेत.

मुंबई : कोरोना संसर्गाचा सर्वात जास्त धोका असलेले दंतवैद्यक दवाखाने हळूहळू सुरु झाले आहेत. मात्र, या दातांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. त्यामुळे, दातांच्या डॉक्टरांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याबाबतची भीती व्यक्त केली असुन नियमावलीचे पालन करुनच उपचार करण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, मुंबईतील डॉक्टरांनी ही या बाबीला दुजोरा दिला आहे. 

मुंबईतील डेंटल क्लिनिक्स सुरु झाले आहेत. मात्र, या डॉक्टरांचा उपचार करताना थेट नाकाचा आणि तोंडाचा संपर्क येत असल्याने त्यांना कोरोनाच्या संसर्गाचा धोका जास्त आहे. मुंबईतील पालिकेच्या नायर दंत वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातही दातांच्या समस्यांवर उपचार केले जात आहेत. या रुग्णालयातील आतापर्यंत 10 ते 12 जण कोरोना पाॅझिटीव्ह आले आहेत. त्यात 2 पोस्ट ग्रेजुएट डॉक्टर्स, 2 निवासी डॉक्टर्स आणि चतुर्थ कर्मचार्यांचा समावेश आहे. त्यामूळे, सर्व प्रकारच्या सुरक्षिततेची काळजी घेऊनच फक्त इमर्जन्सी रुग्णांवर उपचार करावेत असा सल्ला नायर दंत शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे यांनी दिला आहे.

अत्यंत महत्त्वाचं : यंदा थेट विसर्जनासाठी जाता येणार नाही, विसर्जनासाठीची नियमावली वाचून घ्या

जागतिक आरोग्य संघटनेनेची नियमावली - 

  • रुग्णांचे रुटीन चेकअप करताना काळजी घेणे
  • जोपर्यंत कोरोनाचा प्रभाव कमी होत नाही तोपर्यंत रुग्णांची ओरल ट्रीटमेंट न करणे
  • जर आपतकालीन स्थिती उद्भवत असेल तर रुग्णांना व्हिडिओ कॉन्फरेंसिंगद्वारे सल्ला देणे

डॉक्टर्स सध्या संक्रमणाच्या हायरिस्क झोनमध्ये आहे. अशा स्थितीत दातांसंबंधी समस्यांचा उपचार करत असताना लाळेत असलेल्या व्हायरसमुळे संक्रमण पसरण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे कोणत्याही मार्गातून व्हायरसची लागण होऊ शकते. डेंटल क्लिनिकमध्ये डॉक्टर एअरोसोल जनरेटिंग प्रक्रियेचा वापर करतात. याद्वारे संक्रमण पसरण्याचा धोका वाढतो. गाईडलाईन्सनुसार तोंडातील संक्रमण, रक्तस्त्राव, सूज येणे अशा समस्या औषधं, गोळ्यांनी नियंत्रणात येत नसतील तरच दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला आहे. सामान्य समस्यांसाठी दवाखान्यात शक्यतो जाऊ नये असे निर्देश देण्यात आले आहे. 

काय काळजी घ्यावी ?

कोरोनाचा व्हायरस थेट तोंडात आणि नाकाद्वारे शरीरात प्रवेश करतो. कित्येक रुग्ण सौम्य आणि मध्यम लक्षणे घेऊन येतात. अनेकदा चाचण्याही केलेल्या नसतात. त्यामुळे, डॉक्टरांनीच दातांवर उपचार करताना विशेष काळजी घेतली पाहिजे. कोणतीही यंत्रसामुग्री वापरुन ट्रीटमेंट केली जाते त्या एअरोसोलमधून वातावरणात संसर्ग पसरू शकतो. त्यामुळे, प्रत्येक रुग्णानंतर 30 मिनिटं तरी सर्व सफाई करुन सॅनिटायझ केले पाहिजे. रेग्युलर ट्रीटमेंट टाळावी. गंभीर उपचार केले जाऊ शकतात. 

मोठी बातमी - मुंबईत यायला निघाले 45 कोटींचे म्यॅव म्यॅव; मुंबईतील प्रयोगशाळा  हैद्राबादमधील कारखाना उद्धवस्त

या सर्जरी करणे टाळा 

दात ड्रिल्स, रुट कॅनल, क्राऊन कटिंग, इम्प्लांट , इलेक्टीव्ह सर्जरी या सर्जरी टाळाव्यात. ज्या सर्जरीतून संसर्ग पसरण्याची भीती वाटते, अशा शस्त्रक्रिया टाळाव्यात.

डॉक्टर्स काय म्हणतायत 

आता रुग्णालयात रुग्ण थोडे वाढले आहेत. दिवसाला 40 ते 45 रुग्ण येतात. आधी 15 ते 20 रूग्ण असायचे. दात काढायची ट्रीटमेंट केली जाते. औषधं देऊनही ज्यांना त्रास होतोय अशांवर उपचार केले जात आहेत आणि इमर्जन्सी ट्रीटमेंट दिली जातेय. आपल्याकडे कोरोना पाॅझिटीव्ह आलेल्या कर्मचाऱ्यांना इथेच दाखल करुन घेतले होते आणि उपचार केले गेले आहेत. आठवड्याला दोन विभाग सुरू केले गेले आहेत. अजून पुर्णपणे विभाग सुरू व्हायला वेळ लागेल. असं नायर दंत शासकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. नीलम आंद्राडे म्हणालात. 

( संकलन - सुमित बागुल ) 

dentist are at extreme risk amid corona as they are in direct contact with mouth and throat

 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dentist are at extreme risk amid corona as they are in direct contact with mouth and throat