लैंगिक शिक्षणाबद्दल 'शिक्षण' विभागालाच गांभीर्य नाही

दिनेश चिलप मराठे
शनिवार, 19 मे 2018

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु, राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात याबद्दल करावयाच्या उपाययोजनांबद्दल कमालीची उदासिनता आहे.

मुंबई - महाराष्ट्र दिनाचे अवचित्य साधून महाराष्ट्र सकारात्मक कृती समितीची व्हॉट्सअपवर स्थापना केली. ही समिती म्हणजे राज्याच्या विविध ठिकाणी राहणाऱ्या तरुणांची ही संघटना आहे. सध्या या समितीने शालेय मुले आणि त्यांच्या पालक-शिक्षकांसाठी ‘लैंगिक शिक्षण’ या विषयावर कार्यशाळा घेण्याचे ठरवले आहे. परंतु, राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण विभागात याबद्दल करावयाच्या उपाययोजनांबद्दल कमालीची उदासिनता आहे.

या समितीमध्ये अल्पावधीतच या संघटनेस ५० हुन अधिक सदस्य जोडले गेले. यात विद्यार्थी, पत्रकार, शाहिर, डॉक्टर, मुख्याध्यापक, समाज कल्याण विभाग कर्मचारी, मानवधिकार परिषद सदस्य यांचा समावेश आहे. जिल्हा पातळीवर शाळांशी संपर्क करण्यासाठी जिल्हा समन्वयक नियुक्त करण्यात आले आहेत.

असे असले तरी, लैंगिक शिक्षण देण्याबद्दल शासनाचे कोणतेच धोरण आतापर्यंत नसल्याची माहीती कनिष्ठ प्रशासन अधिकारी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद नाशिक यांनी येथे दिली. शासनाच्या सर्व शिक्षा अभियान अंतर्गत सुरू असणाऱ्या योजनांच्या प्रगतीची आकडेवारी मागितली असता प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून ती उपलब्ध झालेली नाही. प्राथमिक तसेच माध्यमिक शिक्षण विभागात फक्त मोफत पाठ्यपुस्तके, जिप शाळांमध्ये मुली, बीपीएल अंतर्गत येणारी तसेच अनुसूचित जाती जमातीतील मुले यांनाच मोफत गणवेश योजना सध्याच्या घडीला सुरू आहे. मात्र, लैंगिक शिक्षणासंदर्भात पूर्णतः प्रतिकूलता असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

अनेक स्वयंसेवी संघटनांकडून शाळांना विविध स्वरूपात देणगी दिल्या जातात. त्याचसोबत शालेय पौगंडावस्थेतील मुलांना योग्य प्रकारचे लैगिक शिक्षण पुरवण्यात येते. यासाठी अनेक शाळा स्वखर्चाने यासाठी निधी उभारतात. परंतु, अशा गंभीर विषयांवर शासनाचे अजिबात लक्ष नसल्याचा सूर शाळेच्या मुख्याध्यापकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर लावला. 

पौगंडावस्थेतील मुलांना योग्य, अयोग्य स्पर्श ज्ञान, शरीराची ओळख, मनावर, बुद्धीवरील संयम याबद्दल सध्या राज्यात काही स्वयंसेवी संस्था काम करतात. मात्र, हे करत असताना त्यांना अनेक प्रकारे आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. विद्यार्थी कल्याणासाठी शाळाच याबाबतीत पुढाकार घेत सुरक्षा यंत्रणा उभारण्यापासून योग्य लैंगिक शिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यापर्यंत काम करते. यासाठी आता शासनानेच पाऊले उचलावी अशी मागणी शाळांमधून करण्यात येत आहे. तसेच या संघटनेच्या स्थापनेसाठी काही तरूण पत्रकारांनी मुख्यतः प्रयत्न केले आहेत. बलात्कार, अत्याचार, गुन्ह्यांनी ढवळून निघालेल्या महाराष्ट्राला विवेक, करुणा आणि प्रेमाचे महत्व या कार्यशाळांद्वारे सांगण्यात येणार आहे. 

लैंगिकतेबद्दल सामान्यतः असणारे कुतुहल, पौगंडावस्थेतील मुलांच्या शंका, प्रश्नांचे निरसन या कार्यशाळांतून करण्यात येणार आहे. जास्तीत जास्त शाळा, संस्थांनी या संघटनेच्या सामाजिक कार्यास हातभार लावण्याचे आवाहन संजय पाटील, चेतन पाटील, विवेक जाधव, विशाल लोणारी, धनंजय दळवी यांनी केले आहे.  

या कार्यशाळा संपूर्णतः मोफत आयोजित केल्या जाणार आहेत. सहभागी होण्यासाठी ९५२७१३८५०५ / ९१६७७१२४७६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.

Web Title: The Department of Education does not have seriousness about sexual education