रिफायनरीला हद्दपार करा !

मार्गदर्शन करताना कोकण शक्ती संघटनेचे सचिव सत्यजीत सावंत
मार्गदर्शन करताना कोकण शक्ती संघटनेचे सचिव सत्यजीत सावंत

मुंबई : आम्ही रत्नागिरीतून रिफायनरी प्रकल्प हद्दपार केला. तुम्हाला रायगडमधून हद्दपार करायचा आहे. कोकणात कुठेही रिफायनरी प्रकल्प झाला तरी कोकणाला घातक ठरणार आहे; मात्र ध्येयापर्यंत पोहचत असताना तुम्हाला अनेक राजकारणी नेते विविध आश्‍वासने देतील. त्यांच्यावर विश्‍वास ठेवू नका. आपल्या मागण्यांवर ठाम राहा, असे आवाहन कोकण शक्ती संघटनेचे सचिव सत्यजित सावंत यांनी सांताक्रूझ येथे केले.

रायगड जिल्ह्यातील चाळीसगाव शेतकरी संघर्ष समितीने आयोजित केलेल्या रिफायनरी प्रकल्पाविरोधी जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी जिल्ह्यातील रिफायनरी प्रकल्पबाधित ४० गावांतील सुमारे ३०० चाकरमानी तसेच आगरी-कोळी युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष नीलेश पाटील व आगरी-कोळी युवा महासंघाचे अध्यक्ष रोशन पाटील उपस्थित होते.

संगठण उभे राहिल्याशिवाय संघर्ष यशस्वी होत नाहीत. शेतकऱ्यांचे संघटन उभे राहत असताना अनेक शक्ती आडव्या येतात. या शक्तींना ऐक्‍यशक्तीने आडवे करून शेतकऱ्यांना ध्येय गाठायचे आहे. प्रदूषणकारी प्रकल्पातून होणारा विकास आम्हाला नको, अशी ठाम भूमिका आपल्याला घ्यायची आहे. त्यासाठी एक मजबूत संघटन उभे राहणे आवश्‍यक आहे. हे संगठन राजकारणविरहित आणि तुमचे तुम्हालाच उभे करायचे आहे. आमच्या विजयी संघर्षाचा अनुभव आम्ही तुम्हाला देऊ; पण शक्ती तुमचीच उभी राहणे गरजेची असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com