कर्नाळा बॅंकेवर ठेवीदारांचा मोर्चा 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2020

पनवेल : कर्नाळा बॅंकेच्या ठेवीदार, खातेदारांना आश्वासन देऊनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. बॅंकेत झालेल्या अनियमिततेमुळे ठेवीदार आणि खातेदारांचे कोट्यवधी रुपये बॅंकेत अडकले आहेत. त्यामुळे खातेदारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बॅंकेतील हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता. 13) पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो ठेवीदार, खातेदार सहभागी झाले होते. 

मुंबई : कर्नाळा बॅंकेच्या ठेवीदार, खातेदारांना आश्वासन देऊनसुद्धा पैसे मिळाले नाहीत. बॅंकेत झालेल्या अनियमिततेमुळे ठेवीदार आणि खातेदारांचे कोट्यवधी रुपये बॅंकेत अडकले आहेत. त्यामुळे खातेदारांना आर्थिक संकटांना सामोरे जावे लागत आहे. बॅंकेतील हक्काचे पैसे परत मिळावेत, यासाठी कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून गुरुवारी (ता. 13) पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये हजारो ठेवीदार, खातेदार सहभागी झाले होते.

हेही वाचा : हवाला व्‍यवसाय कसा चालतो? 

कर्नाळा बॅंकेत 513 कोटी रुपयांची अनियमितता झाली आहे. बॅंकेचे अध्यक्ष, माजी आमदार विवेक पाटील हे अनेक दिवसांपासून ठेवीदार, खातेदारांना पैसे देण्याची फक्‍त आश्वासने देत आहेत, मात्र बॅंकेतील रक्कम दिली जात नाही. उरणचे आमदार महेश बालदी आणि पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी बॅंकेच्या ठेवीदार, खातेदारांना एकत्र करून बॅंकेविरोधात लढा सुरू केला. 

माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या लढ्याचा भाग म्हणून गुरुवारी (ता.13) सकाळी साडेअकरा वाजता पनवेल भाजप मध्यवर्ती कार्यालय येथून मोर्चाला सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामार्गे कर्मवीर भाऊराव पाटील चौकातून भाजी मंडई, शनिमंदिरमार्गे मोर्चा पनवेल येथील कर्नाळा बॅंकेच्या मुख्य शाखेवर धडकला.

हेही वाचा : राणीच्‍या बागेत आले नवीन पाहुणे

या मोर्चावेळी ठेवीदारांनी पैसे आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे, अटक करा, अटक करा, विवेक पाटील व संचालकांना अटक करा, यासह विविध घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या मोर्चात हजारोंच्या संख्येने खातेदार, ठेवीदार सहभागी झाले होते. 

सरकारच्या पाठिब्यांचा आरोप 
शेतकरी कामगार पक्ष राज्य सरकारला पाठिंबा देत असल्याने सहकारमंत्री कर्नाळा बॅंकेच्या संचालकांना पाठीशी घालते आहे का, असा थेट सवाल भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला. येत्या विधिमंडळ अधिवेशनात विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून बॅंकेत झालेल्या घोटाळ्याविषयी आवाज उठवून 1 लाख खातेदारांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती कर्नाळा बॅंक ठेवीदार संघर्ष समितीच्या वतीने या वेळी देण्यात आली. 

कर्नाळा बॅंकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करून राज्यभरातील 17 शाखांमधील ठेवीदारांचे पैसे वसूल करून द्या, या मागणीसाठी मोर्चा काढण्यात आला होता. ठेवीदारांना न्याय मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही. 
- प्रशांत ठाकूर, आमदार, भाजप 

कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत ठेवीदारांच्या पैशांवर शेतकरी कामगार पक्ष चालवला जात आहे. माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्याशी स्पर्धा करण्यासाठी उभारलेल्या कर्नाळा स्पोर्टस्‌ ऍकेडमीसाठी वापरण्यात आलेला पैसा ठेवीदारांना परत करा आणि मग जे करायचं ते करा. 
- महेश बालदी, अध्यक्ष, कर्नाळा ठेवीदार संघर्ष समिती  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Depositors March On Karnala Bank