esakal | Inside Story - हवाला व्यवसाय कसा चालतो?
sakal

बोलून बातमी शोधा

Inside Story - हवाला व्यवसाय कसा चालतो?

येथे शब्दाला किंमत...

Inside Story - हवाला व्यवसाय कसा चालतो?

sakal_logo
By
अनिश पाटील

मुंबई : हवाला, हे नाव हा शब्द ऐकला नसेल असा कदाचितच कुणी सापडेल. हवालाचा गोरख धंदा चालतो कसा? कसे पैसे इथून तिथे पाठवले जातात? जाणून घेऊयात हवालाची Inside Story.

हवाला व्यवसाय हा पूर्ण पणे विश्‍वासावर चालतो. एखाद्या डीमांड ड्राफ्ट सुविधेप्रमाणे हा व्यवहार चालतो. त्यांचे जाळे देशासह परदेशातही पसरलेले आहे. मुंबईतून एखादी रक्कम गुजरातमध्ये पाठवायची असेल, तर मुंबईतील व्यक्ती हवाला व्यवसायाला ती रक्कम देतो. ती रक्कम स्वीकारल्यानंतर गुजरातमधील एजंटला कळवले जाते. त्यानंतर तो त्याच्याकडील रक्कम व्यवसायिकाला पुरवतो. या व्यवहारांमागे एका कोटी मागे एक टक्का, तर एका कोटी पेक्षा कमी रकमेवर दोन टक्के कमिशन आकारले जाते.

मोठी बातमी - ऐकावं ते नवलंच, आता झालाय 'कंडोम स्कॅम', वाचा पूर्ण बातमी..

परदेशातही असे व्यवहार होतात. कोणाला अमेरिकेत 1000 डॉलर हवे असतील तर तो मुंबईत हवाला ऑपरेटर 70000 रुपये देईल. हवाला वाला ह्याचे डॉलर करून अमेरिकेतील त्याला किंवा मुंबईच्या एजंटला देतो. हा सर्व व्यवहार एका डायरीवर लिहिला जातो. सध्या त्यासाठी लॅपटॉपचाही वापर होतो. या प्रकारात दोन्ही कडून पैशांचा व्यवहार होतो त्यामुळे यात सरकारच्या टॅक्‍सची आणि आरबीआयच्या कमिशन ची चोरी होते. असो हा व्यवहार केवळ कर चोरी होते म्हणून बेकायदेशीर आहे. ज्या देशात प्राप्तिकर नाही तिथे हा व्यवसाय पूर्ण पणे कायदेशीर आहे. 

हवाला नेटवर्क व काळा पैसा 

पूर्वीचा काळ गेला, जेव्हा शौचालयाच्या टाकीत पैसे लपवून ठेवले जायचे. आता काळा पैसा मार्केटमध्ये आणून तो पांढरा करण्यात येतो. अगदी काही कोट्यावधी रुपयेही मार्केटमध्ये देऊन पांढले केले जातात. पण ज्यावेळी अरबो रुपयांची गोष्ट असते. त्यावेळी हवाला नेटर्कमार्फत प्रथम हा पैसा परदेशात पाठवला जातो. त्यानंतर संबंधीत व्यक्तींनेच परदेशात उघडलेल्या कंपनीमार्फत कवडीमोल वस्तू चढ्या भावाने खरेदी करून हा काळा पैसा काही टक्केवारी देऊन पांढरा केला जातो.

मोठी बातमी -  चेंजिंग रुममध्येच तिने बसवला 'तिसरा डोळा' आणि म्हणाली 'ड्रेस ट्राय करो'...

महसूल गुप्तवार्ता संचलनालयाने हिरे चढ्या भावाने आयात करण्याच्या प्रकरणामध्ये केलेल्या तपासात अशीच माहिती पुढे आली होती. अगदी एक कोटी रुपयांचे हिरे 100 कोटी रुपयांच्या किंमतीने आयात केले जायचे. या चढ्या भावातील आयातीमागे आयातदारांच्या फायद्या बाबतची माहिती काढण्यासाठी डीआरआयने याप्रकरणी अधिक तपास केला असता त्या माध्यमातून मनी लॉंडरीग केला जात असल्याचा संशय आला. त्यासाठी आयातदार कंपन्यांना चार टक्के कमीशन मिळते. या कमी किमतीच्या हिऱ्यांची आयात केल्यानंतर त्यांच्यावर पैलू पाडण्याचे काम सूरतमध्ये होते. त्यानंतर त्यांची निर्यात केली जाते. पण प्रत्यक्षात देशातील काळा पैसाच या निर्यात केलेल्या हिऱ्यांच्या विक्रीद्वारे परदेशातून भारतात पांढरा होऊन येतो. 

inside story on how hawala works and why it is illegal read full story

loading image