मोठ्या प्रकल्पांसाठी ठेवींचा आधार

deposits are the support for large projects
deposits are the support for large projects
Updated on

मुंबईः मुंबई महापालिकेला दोन वर्षापासून आर्थिक मंदीचा फटका बसत आहे. त्यामुळे मोठे प्रकल्प कसे मार्गी लावायचे, असा प्रश्न पालिकेपुढे निर्माण झाला आहे.

ठेवींवरील व्याजातून समतोल साधण्याचा प्रयत्न 

बँकांमध्ये असलेल्या ६९ हजार कोटी रूपयांच्या ठेवी हाच पालिकेचा सध्याचा मोठा आर्थिक आधार आहे. नव्या अर्थसंकल्पाला मंजुरी देताना ठेवींच्या व्याजातून मिळणाऱ्या रकमेतून अर्थसंकल्प समतोल करण्यासाठी आकड्यांचा खेळ केला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासणार आहे.

किनारी मार्ग, गोरेगाव-मुलुंड लिंक रोड, मलनिस्सारण प्रक्रिया प्रकल्प, गारगाई पिंजाळ प्रकल्प आदी महत्त्वाचे मोठे प्रकल्प महापालिकेने सुरू केले आहेत. जकात बंद झाल्याने पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्त्रोत घटला आहे. मालमत्ता करापोटी मिळणारा महसूल आणि विकास निधीही कमी झाला आहे. आर्थिक मंदीचा फटका बसू लागल्याने मोठ्या प्रकल्पांसाठी निधीची चणचण भासणार आहे

विकास नियोजन खात्यांच्या महसुलावरही मंदीचा परिणाम

विकास नियोजन खात्यांच्या महसुलावरही मंदीचा परिणाम झाला आहे. देशातील सर्वांत श्रीमंत असलेली मुंबई महापालिका सध्या आर्थिक संकटात आहे. राज्य सरकारकडून वस्तू आणि सेवाकर (जीएसटी) या माध्यामातून मिळणारी रक्कम २०२२ पर्यंतच मिळणार आहे. त्यानंतर मात्र ही रक्कम मिळणार नाही. त्यामुळे त्या रकमेसाठी पर्यायी स्त्रोत निर्माण करावा लागणार आहे. पालिकेने ज्या विविध बँकांमध्ये ठेवी ठेवल्या आहेत, त्या ठेवींमधील काही रक्कम तीन वर्षांपासून प्रशासन मोठ्या प्रकल्पांसाठी काढत आहे. या ठेवींवरील व्याजावर किती वर्षे अवलंबून राहायचे, असा सवाल विरोधी पक्षांतील सदस्यांनी उपस्थित केला आहे.

मालमत्ता करमाफीच्या घोषणेचा फटका

मुंबईतील ५०० चौरस फुटांच्या आतील घरांना मालमत्ता कर माफ करण्याची घोषणा केल्याने त्याचा मालमत्ता करावर परिणाम झाला आहे. ५०० चौरस फुटांच्या आतील घरांपोटी मिळणारा मालमत्ता कर आता थांबणार आहे. याची कसर कशी भरून काढायची असा प्रश्न पालिकेपुढे निर्माण झाला आहे. मालमत्ता करमाफीच्या घोषणेचा मोठा परिणाम पालिकेच्या महसुलावर झाला आहे, असे पालिकेतील विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com