Eknath Shinde: वादळामुळे एकनाथ शिंदेंचे हेलिकॉप्टर हवेतच अडकले; जुहू विमानतळावर थरारक लँडिंग, पाहा व्हिडिओ

Eknath Shinde Helicopter News: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर धुळीच्या वादळात अडकले आहे. यामुळे ते जुहू विमानतळावर उतरवण्यात आले आहे.
Eknath Shinde Helicopter caught in storm

Eknath Shinde Helicopter caught in storm

ESakal

Updated on

मुंबई : सध्या ठाणे जिल्ह्यातील कल्याण, उल्हासनगर, अंबरनाथ यासह नवी मुंबई अशा अनेक भागात तुफान वारा सुटला आहे. यामुळे रस्त्यावरधुळीचे साम्राज्य पसरले असून परिणामी नागरिकांची तारांबळ उडाली आहे. पुढील १-२ तासात पावसाची शक्यता असून धुळीचे वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. परिणामी प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. अशातच शहरात आलेल्या धुळीच्या वादळाचा फटका उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हेलिकॉप्टरला बसला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com