esakal | 15 वर्षे सत्ता असूनही खड्डे बुजविता आले नाही ; वंडार पाटील यांचा मित्रपक्षाला टोला
sakal

बोलून बातमी शोधा

Mumbai

15 वर्षे सत्ता असूनही खड्डे बुजविता आले नाही ; वंडार पाटील यांचा मित्रपक्षाला टोला

sakal_logo
By
शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली : कल्याण डोंबिवली (kalyan) (Dombivali) महापालिकेवर गेले 15 वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मात्र त्यांना या 15 वर्षात चांगले रस्ते एकदाही बनविता आले नाहीत. त्यांना कधी कोणी विरोधच न केल्याने आज रस्त्यांची ही अवस्था आहे असा टोला राष्ट्रवादीचे कल्याण डोंबिवली (Dombivali) शहर जिल्हा कार्याध्यक्ष डॉ. वंडार पाटील यांनी कल्याण ग्रामीण येथे मित्रपक्षाला लगावला. राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आहे. त्यामुळे शहरात चांगली कामे करून घेणे हे आमची ही जबाबदारी राहील असे बोलत त्यांनी लगेच पाठराखण देखील केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कल्याण ग्रामीण यांच्या वतीने मानपाडा समाज मंदिर सभागृहात प्रभाग अध्यक्ष नियुक्ती सोहळा सोमवारी पार पडला. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शनपर बोलताना त्यांनी मित्रपक्षावर देखील टीका केली. यावेळी गजानन मांगरुळकर, गुलाब वझे, दत्तात्रय वझे, भगवान पाटील, सुभाष गायकवाड, सुरय्या पटेल, तुषार म्हात्रे, ॲड.ब्रम्हा माळी आदी उपस्थित होते. कल्याण ग्रामीण मधील 31 प्रभागातील प्रमुखांना नियुक्ती पत्र देण्यात आले.

हेही वाचा: Pune : ग्रामीण भागात लसीकरण वाढते

कार्याध्यक्ष पाटील म्हणाले, पालिकेतील खड्डे म्हणजे पालिका आयुक्तांनीही त्याचे काही वाटेनासे झाले आहे. काही पक्ष आंदोलन करतात, पण त्याचाही काही फरक पडला नाही. खड्डे मुक्त पालिका हवी असेल तर पालिकेत राष्ट्रवादी ची सत्ता ही आलीच पाहिजे त्यादृष्टीने काम करा असा सल्ला त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कल्याण ग्रामीण मानपाडा भाग म्हणजे राष्ट्रवादी अशी ओळख होती. मध्यंतरी काही कार्यकर्ते फुटल्याने आपणही कामात मागे पडलो. पण आपली ताकद पुन्हा दाखवून देण्यासाठी कामाला लागा. प्रभाग प्रमुखांनी गाव प्रमुख नेमून 10 जणांची कमिटी तयार करा, अशा पद्धतीने तळागाळातील माणसांपर्यंत पोहोचा. आपले मतदार कसे वाढतील त्यासाठी मेहनत घ्या आदी मार्गदर्शन त्यांनी यावेळी कार्यकर्त्यांना केले.

loading image
go to top