esakal | बंदीनंतरही 'या' माशाला मिळतीये खवय्यांची पसंती!
sakal

बोलून बातमी शोधा

बंदीनंतरही 'या' माशाची खुलेआम पसंती!

न्यायालयाने विक्री करण्यास बंदी घातलेल्या मागूर माशाची पनवेल परिसरातील मासळी बाजारात खुलेआम विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्करोगासारख्या आजारास निमंत्रण देणारा हा मासा स्वस्तात मिळत असल्याने खवय्येदेखील त्याच्या खरेदीला पसंती देत आहे. 

बंदीनंतरही 'या' माशाला मिळतीये खवय्यांची पसंती!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पनवेल : न्यायालयाने विक्री करण्यास बंदी घातलेल्या मागूर माशाची पनवेल परिसरातील मासळी बाजारात खुलेआम विक्री केली जात असल्याचे पाहायला मिळत आहे. कर्करोगासारख्या आजारास निमंत्रण देणारा हा मासा स्वस्तात मिळत असल्याने खवय्येदेखील त्याच्या खरेदीला पसंती देत आहे. 

ही बातमी वाचली का? ज्या गावात भीख मागितली त्याच गावात माझा सत्कार झाला

जानेवारी 2019 मध्ये नवी दिल्लीतील राष्ट्रीय हरित न्याय प्राधिकरणात घेण्यात आलेल्या सुनावणीत विदेशी मागूर माशाचे संवर्धन, विक्री आणि वाहतुकीवर बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यानंतर केरळ सरकारने पहिल्यांदा 1998 मध्ये मांगूर माशावर बंदी घातली होती. यानंतर सन 2019 मध्ये एनजीटीच्या आदेशानंतर भारत सरकारने त्याचे पालन करण्यावर आणि विक्रीवर पूर्णपणे बंदी घातली होती. आशिया खंड आणि प्रामुख्याने भारतात मागूर ही मत्स्य प्रजात खूप प्रसिद्ध आहे. मांगूर मासा हा त्याच्या लांब मिशांमुळे कॅटफिश माशांमध्ये समाविष्ट आहे. 

ही बातमी वाचली का? धनिकांच्या सोईसाठी मुंबई-पुणे महामार्ग बंद

मुख्यतः देशी मांगूर आणि हायब्रीड थाई मांगूर या दोन प्रकाराच्या माशांचे भारतात संवर्धन आणि विक्री केली जाते. परंतु, विदेशी थाई मांगूर मासा मानवी आरोग्यासाठी हानिकारक आहे. तो दिसायला देशी माशासारखाच दिसतो, त्यामुळे देशी आणि विदेशी थाई मागूर माशांतील फरक ओळखणे कठीण आहे. मार्केटमध्ये जिवंत मासा 80 ते 130 रुपये प्रति किलोपर्यंत असतो. मागूरला खाद्य म्हणून मेलेल्या कोंबड्या, चिकन वेस्टचा वापर होतो.

 ही बातमी वाचली का? भिवंडी पालिका ठेकेदारावर मेहेरबान

दोन प्रजातीत उपलब्ध 
थाई आणि आफ्रिकन या दोन प्रजातींत उपलब्ध असलेला हा मासा डबक्‍यात, चिखलात, गटारात जगू शकतो. तसेच काहीही खातो. त्यामुळे त्याचे मांस चरबीयुक्त असते. त्यात जीवाणूही असतात. मांगूर माशात अनेक प्रकार आहेत.