पालघर: पालघर जिल्ह्यात ६ व ७ मे रोजी अवकाळी पावसामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. यामध्ये नागरिकांना बेघर होण्याची वेळही आली. मच्छीमार, शेतकरी, वीटभट्टीवाल्यांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. ग्रामीण भागातील नागरिकांना १८ ते २० तास अंधारात काढावे लागले. पालकमंत्री गणेश नाईक यांनी प्रशासनाला मदत पुरवण्याचे निर्देश न देता व नुकसानग्रस्तांना भेट देणे गरजेचे असताना ते जिल्ह्यात फिरकलेच नाहीत. दुसरीकडे तिरंगा रॅलीसाठी खास पालघरमध्ये येऊन रॅलीमध्ये सहभाग घेतला. त्यांच्या या कृतीविषयी जिल्हावासीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.