पुरेसा साठा असूनही औषध न दिल्याने गुन्हा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 24 डिसेंबर 2016

भिवंडीतील कंपनीवर "एफडीए'ची कारवाई
मुंबई - कुत्रा किंवा इतर जनावराने चावा घेतल्यानंतर उपचारांसाठी प्रभावी असलेले इंजेक्‍शन अंधेरी येथील कंपनीला नाकारल्याने भिवंडीतील फार्मास्युटिकल्स कंपनीतील अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. कंपनीने वस्तू कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) ही कारवाई केली आहे.

अंधेरी येथील "नॉर्थ वेस्ट फार्मा हब' कंपनीने सहा मागणीपत्रांद्वारे रॅबीपूर औषधाची मागणी ग्लॅक्‍सो स्मिथक्‍लाईन फार्मास्युटिकल्स लि. या भिवंडीतील कंपनीकडे केली होती. या कंपनीने अंधेरीतील कंपनीला औषधे दिली नाहीत. औषध न देण्यामागील कारणही दिले नाही. त्यामुळे नॉर्थ वेस्ट फार्मा कंपनीने अन्न व औषध प्रशासनाचे सहआयुक्त हरीश बैजल यांच्याकडे तक्रार नोंदवली. याची शहानिशा करण्यासाठी प्रशासनाने दोन अधिकाऱ्यांना पाठवले. त्यांनी ग्लॅक्‍सो स्मिथक्‍लाईन फार्मास्युटिकल्स कंपनीच्या भिवंडी येथील गोदामाची तपासणी केली. या वेळी संबंधित कंपनीने "रॅबीपूर'च्या एक लाख 28 हजार 410 वायल्सची खरेदी करून त्यांची विक्री व वितरण मुंबईसह राज्यातील अनेक खरेदीदारांना केल्याचे आढळले.

औषधांचा साठा असतानाही कंपनीला औषधे नाकारल्याप्रकरणी "एफडीए'ने कंपनीच्या अधिकाऱ्यांवर भिवंडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

औषधविक्रीसाठी "ना हरकत' अनावश्‍यक
औषधांचा पुरवठा करण्यासाठी किंवा औषधांचे नवीन दुकान उघडण्यासाठी कोणत्याही संघटनेच्या "ना हरकत' प्रमाणपत्राची आवश्‍यकता नसल्याचेही "एफडीए'ने स्पष्ट केले आहे. औषधांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी "ना हरकत' देण्याकरिता कुणी पैशांची मागणी केल्यास "एफडीए'च्या दक्षता विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन "एफडीए'ने केले आहे.

Web Title: Despite the offense did not have enough supply of the drug