पावसाळा तोंडावर येऊनही नालेसफाई नाही, वसई-विरारमध्ये यंदाही पाणी भरणार

vasai virar
vasai virar

विरार : वसई-विरार महापालिका परिसरात गेल्या दोन वर्षांपासून पावसाळ्यात रस्ते पाण्याखाली जात असल्याने त्यावरील उपाययोजनेसाठी नगरसेवकांनी मतभेद विसरून प्रशासनास कामासाठी मंजूरी दिली आहे. त्यानंतरही कामाला सुरूवात झालेली नाही. पावसाळा तोंडावर येऊनही नालेसफाईला सुरुवात न झाल्याने यंदाही पाणी भरण्याची शक्यता आहे. 

वसई-विरार महापालिकेचे तत्कालीन आयुक्त बी. जी. पवार निवृत्त झाल्यानंतर तीन महिन्यापर्यंत आयुक्त म्हणून जिल्हाधिकारी काम पाहत होते. त्यामुळे सहा महिन्यांपूर्वी नालेसफाईला मंजुरी मिळूनही एप्रिल संपत आला, तरी या कामाला सुरुवात झालेली नाही. पालिका परिसरातील नाले कचरा आणि पानवेलींनी भरले आहेत. त्यामुळे हे नाले साफ न झाल्यास शहरात पाणी भरण्याची शक्यता आहे. कामास अद्याप सुरुवात न झाल्यामुळे महिन्याभरात नाले सफाईचे काम पूर्ण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. 

नवीन आयुक्त गंगाधरण डी यांनी 13 मार्चला आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला असला, तरी आल्याापासून त्यांनी चक्क नगरसेवक आणि राजकीय नेत्यांपासून 'सोशल डिस्टन्सिंग' पाळल्याची चर्चा आहे. त्यातच शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना आयुक्त लोकप्रतिनिधींना बाजूला ठेवून काम करत असल्याचा आरोप केला जात आहे. या संदर्भात आयुक्तांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, तो होऊ शकला नाही

पावसाळ्यापूर्वीची कामे सुरु करण्याची गरज 
पावसाळ्यापूर्वी पॅच वर्क आणि इतर कामे कार्यतर मंजुरी घेऊन आयुक्तांनी करावी. शहरात विविध कामासाठी खोदलेल्या रस्त्यांचे पॅच वर्क होणे गरजेचे आहे. त्यातच कोरोनामुळे महासभा, स्थायी समिती सभा किंवा प्रभाग समिती सभा होत नसल्याने आयुकांनी ही कामे आपल्या अधिकारात सुरु करायला हवीत, अशी मागणी होत आहे.

पालिका परिसरात पावसाळ्यात पाणी भरत असल्याने पावसाळ्यापूर्वी नालेसफाई करण्यासाठी महासभेत परवानगी दिली असतानाही प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहिल्याचे दिसत नाही. त्यामुळे याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे. प्रशासनाचे अपयश नंतर लोकप्रतिनिधींवर टाकण्यात येते. या वेळी पाणी भरल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील. 
- प्रवीण शेट्टी , महापौर, वसई-विरार महापालिका 

 

वसई-विरार महापालिका परिसरातील नाल्यांची सफाई चार-पाच दिवसांत सुरु करण्याचा प्रयत्न करणार आहोत. 
- राजेंद्र लाड, बांधकाम अभियंता, वसई-विरार महापालिका

Despite the onset of rains, there is no sanitation, Vasai-Virar will be flooded this year also

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com