Cyrus Mistry : अपघाताची होणार सखोल चौकशी; कारची डेटा चीप पाठवणार जर्मनीला

कार निर्मिती कंपनीकडे या कारची चीप पाठवली जाणार आहे.
Cyrus Mistri Accident
Cyrus Mistri Accidentsakal

पालघर : उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूची पालघर पोलिसांकडून सखोल चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांनी जर्मनीला मिस्त्री यांच्या एसयुव्ही कारनिर्मिती कंपनीकडे कारची चीप पाठवली असून यामध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट आहे का? याची तपासणी केली जाणार आहे. (detailed inquiry going on Cyrus Mistry accident car data chip will be sent to Germany for decoding)

अपघातावेळी कारमधल्या एअरबॅग्ज खुल्या का झाल्या नाहीत? कारमध्ये काही मेकॅनिकल फॉल्ट आहे का? कारच्या ब्रेक फ्ल्यूडचं काय झालं? कारच्या टायर प्रेशरचं काय? असे अनेक प्रश्न पोलिसांनी जर्मनबेस्ड कार निर्मिती कंपनीला विचारले आहेत. पोलिसांच्या या प्रश्नांची उत्तरं आपल्या रिपोर्टमध्ये देणार आहे.

Cyrus Mistri Accident
बारामती जिंकण्याची भाषा करणाऱ्या बावनकुळेंना रुपाली पाटलांचा पुणेरी टोला

सूत्रांच्या माहितीनुसार, कारनिर्मिती कंपनीनं पालघर पोलिसांना माहिती दिली की, मिस्त्री यांच्या अपघातग्रस्त कारची डेटा रेकॉर्डर चीप डिकोडिंगसाठी जर्मनीला पाठवावी लागेल. जर्मनीत हे डिकोडिंग झाल्यानंतर पोलिसांकडे अपघातग्रस्त कारचे संपूर्ण डिटेल्स मिळू शकतील.

Cyrus Mistri Accident
सायरस मिस्त्रींच्या मृत्यूला कोणत्या गोष्टी कारणीभूत? शवविच्छेदन अहवाल आला समोर

या संपूर्ण प्रक्रियेसाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे. या डेटा रेकॉर्डरमध्ये कारची संपूर्ण माहिती उपलब्ध असेल. यामध्ये कारच्या ब्रेकची स्थिती काय होती? एअरबॅग आणि इतर तांत्रिक बाबी काम करत होत्या का? अपघातावेळी कारचा वेग किती होता? या गोष्टींचा समावेश असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com