बांधकामासाठी विकासकाने खासगी मालमत्ता तोडली

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

भिवंडी : भिवंडीत प्रभाग समिती क्र. ५ मध्ये घर क्र. २८, प्रभूआळी ही वडिलोपार्जीत सामाईक मालकीची मालमत्ता असून त्याबाबत भिवंडी न्यायालय व उच्च न्यायालयात दावा सुरू आहे. या मालमत्तेमध्ये मालकी असलेल्या कुटुंबाची सामाईक वहिवाट सुरू आहे व ते सदर जागेत राहून त्या जागेचा वापर करीत आहेत.

असे असताना सुरेश कटारिया या बिल्डरने कोणतीही पूर्वसूचना न देता नव्याने बांधकाम करण्याच्या उद्देशाने मालकी हक्काचे जुने पक्के बांधकाम तोडले. त्यामुळे कुंभार यांनी तक्रार दाखल केली. तसेच पालिकेच्या नगरविकास विभाग व आयुक्तांना नोटीस पाठवून सदर जागेवर नव्याने बांधकामास परवानगी देऊ नये; तर परवानगी दिली असल्यास ती रद्द करावी, अशी वकिलामार्फत नोटीस बजावली आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The developer broke down private property for construction