प्रकल्प रखडवणाऱ्या विकसकांना दणका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 एप्रिल 2017

मुंबई - झोपडपट्टी पुनर्वसन योजना रखडवत ठेवणाऱ्या विकसकांना झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने (एसआरए) दणका दिला आहे. अशा 24 विकसकांना देण्यात आलेल्या परवानग्या रद्द करून रहिवाशांना त्यांच्या पसंतीचा विकसक नियुक्त करण्याची संधी "एसआरए'ने दिली आहे.

झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प 10 वर्षांपासून रेंगाळत ठेवणाऱ्या 114 विकसकांना "एसआरए'ने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये कारवाई करण्याबाबत नोटीस बजावली होती. या नोटिशीला 15 दिवसांत उत्तर न दिल्यास विकसक बदलणे, योजनेचा लिलाव करणे आणि दंड आकारणी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता. अनेक विकसकांनी नोटिशीला उत्तर दिले नाही. त्यामुळे "एसआरए'ने अखेर विविध ठिकाणच्या 24 विकसकांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

Web Title: developer warning for project stoped