विकसकांना  म्हाडाकडून अभय

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 मे 2018

मुंबई - सेसप्राप्त इमारतींच्या पुनर्विकासावेळी रहिवाशांच्या व्यवस्थेसाठी मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाची संक्रमण शिबिरे विकसकांना देण्यात येतात. या संक्रमण शिबिरांचे विकसकाने अनेक वर्षांपासून ११८ कोटींचे भाडे थकवले आहे. त्याच्या वसुलीसाठी अधिकाऱ्यांनी विकसकांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव मुख्य अधिकाऱ्यांकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव फेटाळण्यात आल्याने या विकसकांना अभय मिळाले आहे.

म्हाडाच्या संक्रमण शिबिरातील १५०० घरे विकसकांनी घेतली आहेत. त्यांचे ११८ कोटींचे भाडे विकसकांनी थकवले आहे. प्रकल्प पूर्ण होऊनही अनेक विकसकांनी संक्रमण शिबिरांचा ताबा म्हाडाला दिलेला नाही. या विकसकांना कारवाईची नोटीस काही वर्षांपूर्वी मंडळाने बजावली होती. त्यामुळे काही विकसकांनी थकीत रक्कम म्हाडाकडे जमा केली. या नोटिशीकडे दुर्लक्ष करणाऱ्या विकसकांचे बॅंक खातेही सील करण्यात आले. अनेकांच्या कार्यालयात फारशी रक्कम नसल्याचे उघड झाले आहे.

६० विकसकांनी थकवलेली ११८ कोटींची रक्कम वसूल करण्यासाठी म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. विकसकांकडून थकीत रक्कम वसूल करण्यासाठी अधिकाऱ्यांनी कारवाई सुरू करण्याचा प्रस्ताव मुख्य अधिकाऱ्यांकडे सादर केला होता, मुख्य अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव फेटाळून लावल्याची माहिती सूत्रांनी दिली. मुख्य अधिकाऱ्यांनी विकसकांना अभय दिल्याने आजवर म्हाडाचे नुकसान झाल्याचेही एका अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी सुमंत भांगे यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

Web Title: Developers from MHADA

टॅग्स