देवेन भारती "एटीएस'चे प्रमुख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 16 मे 2019

मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले. 

मुंबई - मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेचे सहआयुक्त देवेन भारती यांची राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाच्या (एटीएस) प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्यासह 19 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बढत्या व बदल्यांचे आदेश राज्य सरकारने बुधवारी (ता. 15) जारी केले. 

मुंबई गुन्हे शाखेचे प्रमुख आशुतोष ढुंबरे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलिस महासंचालकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, तर सध्याचे दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलिस महासंचालक अतुलचंद्र कुलकर्णी यांची पुण्याच्या अपर पोलिस महासंचालक, गुन्हे अन्वेषण विभागपदी नियुक्ती करण्यात आली. संजीव सिंघल यांची मुंबईच्या अपर पोलिस महासंचालकपदी (प्रशासन) नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच, डॉ. सुखविंदर सिंह यांची मुंबईच्या अपर पोलिस महासंचालक (फोर्स वन), अनुपकुमार सिंह यांची अपर पोलिस महासंचालक व मुख्य दक्षता अधिकारी, विनीत अग्रवाल यांची अपर पोलिस महासंचालक (राज्य सुरक्षा महामंडळ) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. 

विशेष पोलिस महानिरीक्षक दर्जाच्या 10 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात प्रताप आर. दिघावकर (विशेष पोलिस महानिरीक्षक, महिला अत्याचार प्रतिबंध, मुंबई), मनोज लोहिया (विशेष पोलिस महानिरीक्षक आणि मुख्य दक्षता अधिकारी, महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळ, मुंबई), दत्तात्रेय मंडलिक (विशेष पोलिस महानिरीक्षक गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे), केशव पाटील (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशिक्षण संचालनालय, मुंबई), पी. व्ही. पांडे (संचालक, महाराष्ट्र गुप्तवार्ता प्रबोधिनी, पुणे), कृष्ण प्रकाश (विशेष पोलिस महानिरीक्षक, प्रशासन), संतोष रस्तोगी (सहपोलिस आयुक्त, गुन्हे, मुंबई), राजवर्धन (सहपोलिस आयुक्त आर्थिक गुन्हे शाखा, मुंबई), अमितेश कुमार (सहआयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग, मुंबई), दीपक पाण्डेय (विशेष पोलिस महानिरीक्षक, सुधार सेवा, मुंबई) यांचा समावेश आहे. 

Web Title: Deven Bharti named new Maharashtra ATS chief