२०१९ विधानसभा निकालांनंतर राष्ट्रवादीचे बडे नेते शरद पवारांचा मेसेज घेऊन वर्षावर गेले होते ? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

सुमित बागुल
Thursday, 26 November 2020

लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेलं 'ट्रेडिंग पावर' हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे.

मुंबई : लेखिका प्रियम गांधी मोदी यांनी लिहिलेलं 'ट्रेडिंग पावर' हे पुस्तक सध्या चांगलंच चर्चेत आहे. अर्थात हे पुस्तक २०१९ मध्ये महाराष्ट्रात पार पडलेल्या सार्वत्रिक विधानसभा निवडणुकांवर आधारित आहेत. लेखिकेचं असं म्हणणं आहे की, २०१९ मध्ये निडणुकांच्या निकालानंतर जेंव्हा महाराष्ट्रात कुणाचं सरकार येईल याबाबत स्पष्टता नव्हती, जेव्हा शिवसेना आणि भाजपचं बिनसलं आणि महविकास आघाडी स्थापन होण्याच्या मार्गावर होती, जेंव्हा फडणवीस आणि अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथ घेतली तेंव्हा अनेक गोष्टी समोर आल्यात. मात्र अशा अनेक गोष्टी होत्या ज्या तेंव्हा समोर आल्या नाहीत. आजही अशा अनेक गोष्टींवरून पडदा उचलला गेलेला नाही. या माहित नसलेल्या गोष्टी लेखिका प्रियम गांधी मोदी यांच्या ट्रेडिंग पावर या पुस्तकात लिहिल्या आहेत. 

महत्त्वाची बातमी नवी मुंबईत कोरोनाच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार, प्रवीण दरेकरांचे गंभीर आरोप

या पुस्तकात शरद पवारांबाबत देखील एक प्रकरण आहे. ज्यामध्ये मागील नोव्हेंबरमध्ये निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे (NCP) काही बडे नेते वर्षावर गेले होते. त्या नेत्यांनी शरद पवार हे भाजप सोबत जाण्यास तयार असल्याचा निरोप होता. ज्यांनंतर दिल्लीत अमित शाह, शरद पवार, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, नवाब मलिक यांच्यात एक बैठक झाली होती. ज्यामध्ये महाराष्ट्रातील भाजप-राष्ट्रवादी मधील सत्ता समीकरणे ठरली होती, असं लिहिलंय. 

महत्त्वाची बातमी : 'वाढीव वीजबिल भरू नका'; राज ठाकरेंचे जनतेला आवाहन

मात्र, या पुस्तकांनंतर राष्ट्रवादीबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होतायत, पक्षावर देखील अनेक आरोप होतायत. अशात या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी उत्तर दिलं आहे. नवाब मलिकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे पुस्तक देवेंद्र फडणवीस यांनीच लिहिलं आहे, ते केवळ लेखिकेला पुढे करत असल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीसांना त्यांच्या ८० तासांच्या सरकारनंतर स्वतःची प्रतिमा मालिन झालीये असं वाटत असेल, म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिण्याचं काम केलं आहे. दरम्यान फडणवीसांनीच हे पुस्तक लेखिकेला लिहायला लावलं आणि त्यासाठी लेखिकेची नेमणूकही केली असा आरोप नवाब मलिकांनी केलाय.

devendra fadanavis appointed writer and wrote trading power book says nawab malik of NCP     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis appointed writer and wrote trading power book says nawab malik of NCP