मोठी बातमी - मंगलप्रभात लोढा यांची फडणवीस करणार हकालपट्टी ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

सध्या मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र मंगलप्रभात लोढा पदावरून हकालपट्टी होण्याचे संकेत मिळतायत

मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज  मुंबईत अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने बैठक बोलावल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यामध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मुंबईतील तसंच राज्यातील काही महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार असल्याचं समजतंय. याचसोबत आमदार, नगरसेवक आणि भाजपच्या जिल्हा अध्यक्षांना बोलावण्यात आलं आहे. आज संध्याकाळी ६ वाजता ही बैठक पार पडणार आहे. मुंबईच्या भाजप कार्यालयात ही बैठक होणार आहे.

मोठी बातमी - मनसे नेत्याने राष्ट्रवादीच्या नेत्याच्या डोक्यात घातला दगड...

गेल्या काही दिवसात घडलेल्या घटना पाहता, सध्या भाजपात सगळं काही आलबेल नाही का? असा प्रश्न निर्माण होतोय. अशात आजची बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जातेय. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी पदभार स्वीकारला आहे. अशातच आता मुंबई प्रदेश अध्यक्षपदाबाबत निर्णय संध्याकाळी घेतला जाणार असल्याचं बोललं जातंय. 

सध्या मंगलप्रभात लोढा हे भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आहेत. मात्र मंगलप्रभात लोढा यांची हकालपट्टी होण्याचे संकेत देखील मिळतायत. मंगलप्रभात लोढा हे बांधकाम व्यावसायिक आहेत. मुंबईतील मलबार हिल मतदारसंघातून लोढा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेत. विधानसभा निवडणुकीवेळी मंगलप्रभात लोढा यांच्याकडे मुंबई प्रदेशाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली होती.  आता लोढा यांना मुंबई भाजप प्रदेशाद्यक्षपदावरून हटवण्यात येणार असल्याचं समजतंय. 

मोठी बातमी -  कांदा पुन्हा रडवतोय! झाली 'इतकी' दरवाढ...

गेले काही दिवस मंगलप्रभात लोढा यांनी कोणत्याच मुद्द्यावर ठाम अशी भूमिका घेतलेली पाहायला मिळालेली नाही. अशात मंगलप्रभात लोढा यांच्या हकालपट्टीचं  नेमकं कारण काय? हे अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, संघटनात्मक बदल करताना, मंगलप्रभात लोढा यांनी पक्षाऐवजी स्वतःच्या मर्जीतील लोकांचा विचार केल्याचं देखील बोललं जातंय.      

आता मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष कोण ? 

आशिष शेलार हे या आधी मुंबई भाजप प्रदेशाध्यक्ष राहिलेत. अशात पुन्हा एकदा आशिष शेलार यांचं नाव चर्चेत येतंय. आशिष शेलार यांच्याबरोबर अतुल भातखळकर, पराग आळवणी यांच्यादेखील नावांची मुंबई भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे.   

devendra fadanavis called important meeting in mumbai mangalprabhat loddha might be removed from bjp mumbai prez post

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: devendra fadanavis called important meeting in mumbai mangalprabhat loddha might be removed from bjp mumbai prez post