आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'बेबी मर्सिडीज'... | Devendra Fadanvis | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devendra fadanvis

आदित्य ठाकरेंच्या टीकेला फडणवीसांचे खोचक प्रत्युत्तर; म्हणाले, 'बेबी मर्सिडीज'...

मुंबई : बाबरी मशिद पाडली जात असताना आपण तिथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला होता. त्यांच्या या दाव्यावर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोरदार टोला लगावत फडणवीस 1857 च्या उठावातदेखील असतील अशी टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना फडणवीस यांनी मर्सिडीज बेबीला संघर्ष काय कळणार? असा टोला लगावला आहे. (Devendra Fadanvis Criticism On Aditya Thackeray)

हेही वाचा: राज ठाकरे म्हणजे सेक्युलर जननायक; हिंदु महासंघाची टीका

फडणवीस म्हणाले, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले जे मर्सिडीज बेबी आहे. त्यांना ना संघर्ष करावा लागला आहे ना त्यांनी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे कारसेवकांच्या संघर्षाची थट्टा ते निश्चितपणे उडवू शकतात, असा टोला फडणवीस यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. मात्र, आमच्या सारखे हजारो लाखो कारसेवक कितीही थट्टा उडवली तरीही आम्हाला गर्व असल्याचे म्हणत ज्यावेळी बाबरीचा ढाचा पाजला त्यावेळी माझ्यासह अनेक जण तेथे होतो. एवढेच नव्हे तर, त्यावेळी आपण नगरसेवक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.

हेही वाचा: मनसुख हिरेन हत्या: प्रदीप शर्मा मुख्य सूत्रधार; NIAचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

काय म्हणाले होते फडणवीस

गेल्या रविवारी मुंबईत भाजपाने बूस्टर डोस सभा घेतली होती. यावेळी बाबरी पाडली तेव्हा आपण स्वतः तेथे होतो असा दावा देवेंद्र फडणवीस केला होता. एवढेच नव्हे तर, मशिदींवरील भोंगे काढायची यांची हिंमत नाही आणि म्हणतात बाबरी मशीद आम्ही पाडली असा टोला देखील फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना लगावला होता. तसेच मशिदींवरील भोंगे काढण्यास सांगितले तर यांची काय परिस्थिती झाली हे सर्वांनी पाहिले असाही टोला त्यांनी लगावला होता.

Web Title: Devendra Fadanvis Criticism Aaditya Thackeray Over 1857 Indian Rebellion Statement

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top