देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन

देवेंद्र फडणवीस यांच्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे आज प्रकाशन

मुंबई :  विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेल्या ‘अर्थसंकल्प सोप्या भाषेत’ या पुस्तकाचे प्रकाशन आज (ता.4) सायं. 5 वाजता विधानभवन, मुंबई येथे होत आहे.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोर्‍हे, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आदी मान्यवर याप्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अर्थशास्त्राचे विद्यार्थी आणि अभ्यासक यांना हे पुस्तक अतिशय उपयुक्त ठरणार आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची प्रस्तावना या पुस्तकाला लाभली आहे.

devendra fadnavis book of arthsankalp sopya bhashet will be publish today

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com