

Fadnavis Challenges Thackeray Over Mumbai’s 25-Year Progress
Sakal
मुंबई : उद्धव ठाकरेंनी गेल्या पंचवीस वर्षात मुंबईत केलेले एक विकासकाम सांगावे, मी त्यांना तीन हजार रुपये देईन, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांची तसेच त्यांच्या शिवसेनेची खिल्ली उडवली. अंधेरी येथे भाजप शिवसेना महायुतीच्या प्रचार सभेत ते बोलत होते. आम्ही मुंबई स्लम फ्री करणार आहोत, म्हणजेच प्रत्येक झोपडपट्टीवासीयाला त्याच्या मालकीचे घर मिळवण्यासाठी आम्ही काम करीत आहोत, असेही ते म्हणाले.