
मुंबई : ‘‘गृहमंत्री असल्याने माझ्याशी अनेक प्रकरणांचा संबंध जोडला जातो. ते माझे सगेसोयरे असल्याचा आरोप होतो. पण मी एकच सांगतो की संविधान माझे सगे आहेत आणि राज्यातील १३ कोटी जनता हेच माझे सोयरे आहेत. माझा कोणी कितीही जवळचा, पण अपराधी असेल तर त्याला सोडणार नाही,’’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज स्पष्ट केले.