Dharavi Redevelopment: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर, मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं प्रकल्प कधी पूर्ण होणार?

CM Devendra Fadnavis: धारावीचा विकास सिंगापूर-हाँगकाँगच्या धर्तीवर करण्यात येणार असल्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच हे प्रकल्प कधी पूर्ण होणार याबाबतही अपडेट समोर आले आहे.
Dharavi Redevelopment

Dharavi Redevelopment

ESakal

Updated on

मुंबई : 'सिंगापूर आणि हाँगकाँगमधील आधुनिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या धर्तीवर धारावीचा पुनर्विकास करण्यात यावा. मात्र, हा प्रकल्प राबविताना धारावीतील नागरिक, त्यांची उपजीविका आणि स्थानिक वैशिष्ट्ये यांना केंद्रस्थानी ठेवण्यात यावे,' असे निर्देश सोमवारी (ता. ८) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तसेच ठरलेल्या कालावधीतच प्रकल्प पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात यावे, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com